ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज पॅट कमिन्स मागच्या मोठ्या काळापासून कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये संघाचे नेतृत्व करत आहे. कर्णधारपद स्वीकारल्यानंतरही कमिन्सच्या प्रदर्शनावर नेतृत्वाचा कुठलाच परिणाम झाल्याचे दिसले नाहीये. पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात कमिन्सच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलियन संघ 79 धावांनी जिंकला. या सामन्यात कमिन्सने सर्वाधिक 10 विकेट्स घेतल्या असून त्याच्या नावावर एका मोठ्या विक्रमाची नोंद देखील झाली.
कर्णधार म्हणून पॅट कमिन्स (Pat Cummins) याने ऑस्ट्रेलियाला जागतिक कसोटी अजिंक्यपद, ऍशेसे मालिका आणि त्यानंतर विश्वचषकात विजेतेपद मिळवून दिले. पाकिस्तानविरुद्ध तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत देखील ऑस्ट्रेलियाने विजयी आघाडी घेतली. पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी मालिकेत पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाच्या महान खेळाडूंमध्ये सामील झाला. त्याने यादरम्यान 250 कसोटी विकेट्सचा टप्पा पार केला असून अशी कामगिरी करणारा तो 10वा ऑस्ट्रेलियन गोलंदाज ठरला. या यादीत शेन वॉर्न, ग्लेन मॅकग्रा आणि नाथन लियोन अशा काही दिग्गजांचा समावेश आहे. कमिन्स सध्या या यादीत दहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या या दुसऱ्या कसोटी सामन्यात कमिन्सने पहिल्या डावात 5 आणि दुसऱ्या डावात 5 विकेट्स घेतल्या. हा सामना सुरू होण्याआदी जोश हेजलवूड आणि कमिन्सने प्रत्येकी 242-242 विकेट्स घेतल्या होत्या. हेझलवूडने 64, तर कमिन्स 56 सामन्यात ही कामगिरी केली होती. पण मंगळवारी मेलबर्नमध्ये सुरू झालेल्या या कसोटी सामन्यात कमिन्सने मोठी झेप घेतली. हेजलवूड या सामन्यात दोन विकेट्स घेऊ शकला, तर कमिन्सने मात्र 10 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियन कर्णधाराने याच प्रदर्शनाच्या जोरावर ग्राहम मॅकेंजी (246 विकेट्स) आणि रिजी बेनोड (248 विकेट्स) यांनी मागे टाकले.
ऑस्ट्रेलियासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत शेन वॉर्न पहिल्या क्रमांकावर आहेत. वॉर्नने आपल्या कारकिर्दीत तब्बल 708 विकेट्स घेतल्या. दुसऱ्या क्रमांकावर ग्लेन मॅकग्रा (563 विकेट्स) आहेत. तिसऱ्या क्रमांकावर नाथन लियोन (505 विकेट्स), चौथ्या क्रमांकावर डेनिस लिली (355 विकेट्स), पाचव्या क्रमांकावर मिचेल स्टार्क (342 विकेट्स), सहाव्या क्रमांकावर मिचेल जॉनसन (313 विकेट्स), सातव्या क्रमांकावर ब्रेट ली (310 विकेट्स), आठव्या क्रमांकावर मॅकडरमॉट (391 विकेट्स), तर नवव्या क्रमांकावर जेसन गिलेस्पी (259) आहेत. पॅट कमिन्स (252) या यादीत नव्याने सामील झाला असून यादीत दहावा क्रमांक त्याला मिळाला आहे.
पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील या कसोटी मालिकेचा विचार केला, तर पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 360, तर दुसऱ्या सामन्यात 79 धावांनी विजय मिळवला. या दोन विजयांसह यजमान ऑस्ट्रेलियाने ही कोसटी मालिकाही नावावर केली. तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना 3 जानेवारी रोजी सिडनीमध्ये सुरू होईल. (Pat Cummins became the 10th Australian bowler to take 250 wickets in Test cricket)
महत्वाच्या बातम्या –
स्मिथ देत होता त्रास, झटक्यात मागे वळून बाबरने दाखवली बॅट, पठ्ठ्याने हातच जोडले; पाहा Video
भारताला पहिल्या कसोटीत हरवल्यानंतर दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का, कर्णधार बावुमा दुसऱ्या कसोटीतून बाहेर