ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्स सध्या जगातील सर्वात घातक गोलंदाजांपैकी एक आहे. सोमवारी (19 जून) कमिन्सने एक असा चेंडू टाकला जाच्या चांगलीच चर्चा झाली. इंग्लंडचा वरच्या फळीतील फलंदाज ऑली पोप कमिन्सच्या या चेंडूवर बाद झाला. ऍशेस 2023चा पहिला सामना सद्या बर्मिंघमच्या एजबस्टन स्टेडियमवर आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी कमिन्सचा हा घातक यॉर्कर चाहत्यांना पाहायला मिळाला.
ऍशस 2023 हंगामाची चाहते मागच्या बऱ्याच महिन्यांपासून पाट पाहत होते. बुधवारी (16 जून) असेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली. ऍशेसमधील पहिला सामना चांगलाच रंगात आहे. या सामन्यातील पहिल्या डावानंतर इंग्लंड संघ 7 धावांच्या आगाडीवर होता. चौथ्या दिवसी पहिले सत्र संपेपर्यंत इंग्लंडने आपल्या पाच महत्वापूर्ण विकेट्स गमावल्या होत्या आणि संघाची धावसंख्या 155 होती. तत्पूर्वी तिसऱ्या दिवसाखेर इंग्लनडे 2 बाद 28 धावा केल्या होत्या. पावसामुळे तिसऱ्या दिवसाचा केळ पूर्ण होऊ सकला नव्हता.
इंग्लंडसाठी तिसऱ्या क्रमांकावर खेळणारा ऑली पोप (Ollie Pope) पहिल्या डावाप्रमाणे दुसर्या डावातही स्वस्तात बाद झाला. पॅट कमिन्स (Pat Cummins) याने टाकलेल्या घातक यॉर्करवर त्याने 14 धावा करून विकेट गमावली. तत्पूर्वी पहिल्या डावात पोपने 31 धावांची खेळी केली होती. एजबस्टन कसोटीत इंग्लंडचा हा वरच्या फळीतील फलंदाज अपयशी ठऱला, पण कमिन्सचे मात्र कौतुक होत आहे. पहिल्या डावात एकही विकेट न घेणारा कमिन्स सोमवारी पहिल्याच सत्रात दोन विकेट्स नावावर करू शकला. दरम्यान, त्याने पोपला ज्या चेंडूवर बाद केले, तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया यावर पाहायला मिळत आहेत.
The perfect yorker ????
Pat Cummins at his sizzling best ♨#SonySportsNetwork #TheAshes #ENGvAUS #RivalsForever pic.twitter.com/E6EIHQBI2u
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) June 19, 2023
सामन्याच्या एकंदरीत विचार केला, तर इंग्लंडने नाणेफेक जिंकून पहिल्या डावात 8 बाद 393 धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर फलंदाजीला आलेला ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या डावात 386 धावांपर्यंत मजल मारू शकला. दोन्ही संघांसाठी प्रत्येक एक-एक फलंदाज पहिल्या डावात शतक करू शकला. इंग्लंडसाठी जो रुटने 118, तर ऑस्ट्रेलियासाठी उस्मान ख्वाजाने 141 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. गोलंदाजी विभागाचे प्रदर्शन पाहिले, तर स्टुअर्ट ब्रॉड आणि ऑली रॉबिन्सन यांनी पहिल्या डावात इंग्लंडला प्रत्येकी तीन-तीन विकेट्स मिळवून दिल्या. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फिरकीपटू नेथन लायन याने चार, तर जोश हेजलवूडने दोन विकेट्स घेतल्या. नेथन लायन दुसऱ्या डावात देखील चांगली गोलंदाजी करताना दिसत आहे. (Pat Cummins Bowled Perfect Yorker to dismiss Ollie Pope.)
महत्वाच्या बातम्या –
वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेत मोहम्मद शमीला विश्रांती! पुजाराविषयी देखील मोठी अपडेट
पुणेरी पलटन पहिल्याच सामन्यात गतविजेत्यांना भिडणार, अल्टिमेट टेबल टेनिसचे वेळापत्रक जाहीर