आयपीएल 2021 मधील 14वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकता नाईट रायडर्स यांच्यामध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडीयमवरती खेळवण्यात आला. या सामन्यात चेन्नईने कोलकाताचा 18 धावांनी पराभव केला. या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करीता उतरलेल्या चेन्नईने 220 धांवाचा डोंगर उभा केला.
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला कोलकाता संघ 20 षटकांत 202 धावा करू शकल्याने त्यांना 18 धावांनी पराभव पत्करावा लागला. परंतु त्या अगोदर कोलकाता संघातील अष्टपैलू खेळाडू पॅट कमिन्सने झुंझार खेळी करत आपल्या नावे एक विक्रम नोंदवला.
चेन्नई प्रथम फलंदाजी करताना केलेल्या 220 धावांचा पाठलाग करताना कोलकता संघातील पहिले पाच फलंदाज स्वस्तात बाद झाले. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या दिनेश कार्तिकने आणि आंद्रे रसेलने डाव सावरण्याचा प्रयत्न केला परंतु सॅम करनने आंद्रे रसेलचा त्रिफळा उडवत कोलकाता संघाला आणखी एक धक्का दिला.
यानंतर आलेल्या पॅट कमिन्सने झुंजार खेळी केली. यामध्ये त्याने 16 व्या षटकांत सॅम करनला एका षटकांत 30 धावा कुटल्या. या षटकांत करनने पहिल्या चेंडूवरती 2 धावा दिल्या परंतु त्यानंतर कमिन्सने सलग तीन षटकार, मग पुढच्या चेंडूवरती एक चौकार आणि शेवटच्या चेंडूवर अजून षटकार ठोकून एका षटकांत 30 धावा केल्या. त्यामुळे एका षटकांत सर्वाधिक धावा करणार्या फलंदाजांच्या यादीमध्ये त्याने आपले नाव नोंदविले आहे.
आयपीएलमध्ये एकाच षटकात ३० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याने स्थान मिळवले. यात ख्रिस गेल अव्वल स्थानी असून सुरेश रैना दुसऱ्या स्थानी आहे. गेलने एकाच षटकात ३६ धावा काढण्याचा कारनामा केला होता. तर रैनाने ३२ धावा काढल्या होत्या. याव्यतिरिक्त वीरेंद्र सेहवाग, शॉन मार्श, विराट कोहली आणि राहुल तेवातिया यांनी एकाच षटकात ३० धावा काढण्याचा पराक्रम केला आहे. याच रांगेत आता कमिन्सने स्थान मिळवले आहे.
Batsmen scoring 30+ runs off a bowler in an over in IPL:
36 – Gayle off Parameswaran
32 – Raina off Awana
30 – Sehwag off Symonds
30 – S Marsh off van der Wath
30 – Gayle off Rahul Sharma
30 – Kohli off S Kaushik
30 – Tewatia off Cottrell
30 – Cummins off Curran#IPL2021— Bharath Seervi (@SeerviBharath) April 21, 2021
या मुंबईत खेळल्या गेलेल्या सामन्यात कोलकाता कर्णधार इऑन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे फलंदाजी करीता उतरलेल्या सीएसकेने सलामीवीर फाफ डु प्लेसिसच्या नाबाद 95 धावांच्या जोरावर 220 धावा केल्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या कोलकाताने 31 धावांतच आपले 5 गडी गमावले होते. त्यानंतर आलेल्या रसेलने 54 धावांची स्फोटक खेळी करत डाव सावरला. परंतु सॅम करनने त्याला बाद केले. शेवटच्या पाच षटकांत केकेआरला 75 धावांची गरज होती. त्यामुळे आठव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या पॅट कमिन्सनेही 66 धावंची झुंझार खेळी केली. परंतु तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला.
महत्वाच्या बातम्या:
अखेर प्रतिक्षा संपली! धोनीने मारला यंदाच्या हंगामातील पहिला षटकार, पाहा व्हिडिओ
व्हिडिओ : राजस्थान रॉयल्सच्या या खेळाडूने केली बुमराह, अश्विन आणि भज्जीच्या गोलंदाजीची नक्कल
सलग तिसऱ्या पराभवानंतर ओएन मॉर्गनने व्यक्त केला संताप, या खेळाडूंवर फोडले पराभवाचे खापर