भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 फायनलच्या दृष्टिकोनातून दोन्ही संघांसाठी ही मालिका महत्त्वाची असेल.
या मोठ्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियानं आतापासूनच तयारी सुरू केली आहे. संघाचा कर्णधार पॅट कमिन्सनं काही काळापूर्वी क्रिकेटमधून ब्रेक जाहीर केला होता. तो मेजर लीग क्रिकेटनंतर एकही सामना खेळलेला नाही. ऑस्ट्रेलिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून, कमिन्स या दौऱ्यावर गेलेला नाही. मात्र त्याच्या अनुपस्थिततही ऑस्ट्रेलियन संघ 5 सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे.
पॅट कमिन्सनं त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो नेट्समध्ये गोलंदाजी करताना दिसतोय. नेट्समध्ये गोलंदाजी करताना कमिन्सनं स्वत:ला येत्या कसोटी हंगामासाठी सज्ज असल्याचं सांगितलं. त्यानं त्याच्या इंस्टाग्राम पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, “मी एका मोठ्या हंगामासाठी तयार होत आहे. प्री-सीझन ब्रेकनंतर माझा पहिला सराव.”
View this post on Instagram
सध्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीबाबत ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे एकापाठोपाठ एक वक्तव्य येत आहेत. रिषभ पंतबाबत बोलताना कमिन्स म्हणाला होता की, प्रत्येक संघात एक किंवा दोन महत्त्वाचे खेळाडू असतात, जसे ऑस्ट्रेलियाचे ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श आहेत. तसेच टीम इंडियाकडे रिषभ पंतसारखा यष्टिरक्षक फलंदाज आहे. या मालिकेत तो खूपच आक्रमक दिसू शकतो. रिषभ ज्या प्रकारे रिव्हर्स स्लॅप खेळतो, तो अविश्वसनीय शॉट आहे. हा त्याचा नैसर्गिक खेळ आहे. गेल्या काही मालिकांमध्ये त्याचा फॉर्म अतिशय आक्रमक होता. मात्र आम्ही त्याला शांत ठेवण्याचा प्रयत्न करू.”
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारताचा पहिला सामना 22 ते 26 नोव्हेंबर दरम्यान पर्थमध्ये होणार आहे. दुसरा सामना 6 ते 10 डिसेंबर दरम्यान ॲडलेड येथे होईल. ही दिवस-रात्र कसोटी असले. तिसरा सामना ब्रिस्बेनमध्ये 14 ते 18 डिसेंबर दरम्यान खेळला जाणार आहे. चौथा सामना 26 ते 30 डिसेंबर दरम्यान मेलबर्न येथे तर पाचवा सामना 3 ते 7 जानेवारी दरम्यान सिडनी येथे होणार आहे.
हेही वाचा –
वीरेंद्र सेहवागची राजकारणात एंट्री? उघडपणे केला या पक्षाच्या नेत्याचा प्रचार
गुरबाजचा धमाका! आयसीसी वनडे रँकिंगमध्ये मोठी झेप, अशी कामगिरी करणारा पहिलाच अफगाणी खेळाडू
कानपूर कसोटीत पुन्हा दिसेल अश्विनचा दरारा, वॉर्न-झहीर सारख्या दिग्गजांचे रेकॉर्ड धोक्यात!