सध्याच्या तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स खूप फॉर्ममध्ये आहे. पॅट कमिन्स ऑस्ट्रेलिया संघाचा महत्वाचा खेळाडू असून एकदिवसीय सामन्यांचा तो उपकर्णधार देखील आहे. पॅट कमिन्सची क्रिकेट कारकिर्दीतील गेली काही वर्षे खूप चांगली गेली आहेत. त्यामुळे त्याला व्यावसयिक क्रिकेटमध्ये सुद्धा खूप मागणी आहे.
पॅट कमिन्सला आयपीएलमध्ये खूप संघांनी बोली लावली होती. परंतु, त्याला किंग खानच्या कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघाने आपल्या ताफ्यात घेतले. केकेआर संघाने त्याला तब्बल १५.५ करोड रुपयात विकत घेतले. तो त्यावेळेसचा सर्वात महागडा विदेशी खेळाडू ठरला. पण केकेआरमध्ये येण्याअगोदरचा कमिन्सचा आणि बॉलिवूडचा स्टार अभिनेता शाहरुख खान यांचा एक मजेशीर असा किस्सा आहे, तो आपण जाणून घेऊया…
हल्लीच एका युटूब चॅनेलसोबत बोलताना पॅट कमिन्सने आयपीएलबाबत एक किस्सा सांगितला. तो किस्सा होता शाहरुख खान आणि त्याचा पहिल्या भेटी दरम्यानचा. शाहरुख खान बॉलीवूडचा सुपरस्टार आहे. त्याला भेटण्यासाठी लोकं आतुर असतात. पण पॅट कमिन्ससोबत असे झाले नाही. पहिल्या भेटी दरम्यान पॅट कमिन्सने शाहरुखला ओळखलेसुद्धा नव्हते.
‘अनुभव जैन’च्या शो मध्ये पॅट कमिन्स बोलतो कि, ‘शाहरुख खान एक शांत स्वभावाचा माणूस आहे. त्याची एक वेगळी दुनिया आहे. पहिल्यांदा शाहरुख खानला भेटलो तेव्हा मला काहीच कल्पना नव्हती की तो कोण आहे? मी कदाचित १८-१९ वर्षांचा असेल आणि मी कधीच बॉलीवूडचे चित्रपट पाहिले नव्हते आणि अजून मला पहिल्या मुलाखतीबद्दल एवढे काही आठवत नाही.’
तसेच पॅट कमिन्सपुढे सांगतो कि, ‘शाहरुख नेहमी खेळाडूंना खेळाचा आनंद घ्यायला देतो. तो कधीही खेळाडूंवर अतिरिक्त जवाबदारी टाकत नाही. गेल्या मोसमात तो संघासोबत नव्हता. परंतु, नेहमी झूम मिटिंगमध्ये खेळाडूंसोबत चर्चा करायचा. एका संघ मालकापासून आपण अजून अपेक्षा नाही ठेऊ शकत. तो जेवढे करतो आहे ते संघासाठी पुरेसे आहे.’
दरम्यान, दिनेश कार्तिकने सोशल मिडियाद्वारे सांगितले कि येत्या उर्वरित आईपीएल सामन्यांसाठी पॅट कमिन्स उपलब्ध नसेल. वाढत्या कोविड संक्रमनामुळे त्याने उर्वरित हंगामातून आपले नाव मागे घेतले आहे. पॅट कमिन्सने आईपीएल कारकिर्दीत एकूण ३७ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ३०.१३च्या सरासरीने ३८ गडी बाद केले आहेत. त्यात त्याची सर्वोत्तम खेळी ४/३४ अशी राहिली आहे. तसेच फलंदाजीत त्याने २ अर्धशतक केली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘काय मनमोहक उन्हाळा आहे’; अनुष्का इंग्लंडच्या वातावरणाचा लुटतेय आनंद, पाहून तुम्हीही पडाल प्रेमात
आनंदी आनंद गडे! सामना विजयानंतर केन्या महिलांचे लक्षवेधी सेलिब्रेशन, केला जबराट डान्स
याला म्हणतात धावांचा पाऊस! वर्ल्ड टेस्ट चँपियनशीपमध्ये धावांचा डोंगर उभारणारे ५ फलंदाज





