---Advertisement---

जस्टिन लँगरच्या ‘भित्रा’ या वक्तव्याला पॅट कमिन्सचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाला, ‘ऑस्ट्रेलिया संघात…’

On: मंगळवार, नोव्हेंबर 29, 2022 3:56 PM
Aus Team Pat Cummins
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया पुरूष क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक जस्टीन लॅंगर यांनी केलेल्या विधानांवर क्रिकेट वर्तुळात एक नवे वादळ उठले. त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत ऑस्ट्रेलियाचा कसोटी आणि वनडे संघाचा कर्णधार पॅट कमिन्स याच्यासाठी ‘भित्रा’ या शब्दाचा वापर केला होता. त्यावर आता कमिन्सने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटले की, ऑस्ट्रेलियाच्या संघात कोणीही भित्रा नाही. मैदानात काय सुरू आहे त्यापेक्षा मैदानाबाहेर काय चालले आहे, यावर अधिक चर्चा होते हे अत्यंत खेदजनक आहे.

झाले असे की, जस्टिन लॅंगर (Justin Langer) यांना संघ जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर होता तेव्हा प्रशिक्षक पदावरून काढले होते. त्यामुळे त्यांना काढण्यामध्ये अनेकांचा हात होता, असे त्यांनी नुकतेच दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. या मुलाखतीत त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला.

लॅंगर यांंनी मुलाखतीत पॅट कमिन्स (Pat Cummins) आणि ऍरॉन फिंच यांच्यामुळेच आपले प्रशिक्षक पद गेले होते, असा आरोप केला होता. नंतर त्यांनी त्याचे स्पष्टीकरणही दिले होते.

लॅंगर यांनी म्हटले, “काही जण माझ्यासमोर चांगले वागत होते. माझ्या पाठीमागे मात्र काहीतरी वेगळेच चालू  होते, हे मला वर्तमानपत्रांमध्ये वाचायला मिळाले. काही पत्रकारांनी ‘सोर्स’ शब्द लिहिण्याऐवजी ‘भित्रा’ लिहावा. कारण माझ्यासमोर कोणी काहीच बोलले नाही आणि ते आपल्या फायद्यासाठी त्याचा वापर करत आहेत.”

“ऑस्ट्रेलिया संघात कोणीही भित्रा नाही. याचा आमच्या संघावर कोणताही परिणाम झाला नाही. लॅंगर यांनी नंतर स्पष्टीकरणही दिले, याबाबत मी त्यांचे धन्यवाद म्हणतो. मागील एका वर्षात आम्ही ज्या प्रकारचा खेळ केला आहे, ते पाहून गर्व वाटतो,” असे कमिन्सने म्हटले आहे.

ऑस्ट्रेलियाने लॅंगर यांच्या प्रशिक्षणादरम्यान टी20 विश्वचषक 2021 आणि ऍशेस मालिका 4-0 अशी जिंकली होती. यामुळे त्यांच्या कार्यकाळाचा कालावधी काही महिने आणखी वाढवला जाणार होता, मात्र खेळाडूंनी त्यावर नाराजी दर्शवली. Pat Cummins Reply on Justin Langer cowards

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियाचा ‘फ्युचर प्लॅन’ आला समोर; पुढच्या एका वर्षात होणार हे बदल
‘या’ गोलंदाजासोबत खेळण्याचा मला फायदाच, अर्शदीप सिंगने सांगितले चकित करणारे नाव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---