---Advertisement---

Video : रोहित शर्माच्या रूपात भारताला पहिला धक्का; टीम पेनने घेतला अप्रतिम झेल

On: मंगळवार, जानेवारी 19, 2021 7:49 AM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान ब्रिस्बेन येथे सुरू असलेल्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी 328 धावांचे लक्ष्य पार करायचे आहे. सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय संघाच्या मोठ्या अपेक्षा अनुभवी सलामीवीर रोहित शर्माकडून होत्या. मात्र दिवसाच्या पहिल्याच सत्रात पॅट कमिंसच्या एका अप्रतिम चेंडूवर रोहित बाद झाला.

चौथ्या दिवसाखेरच्या बिनबाद 4 धावांवरून पुढे फलंदाजी करण्यासाठी आलेले रोहित व गिल पूर्णतः आश्वस्त वाटत होते. रोहितने सावध पवित्रा घेत सुरुवातीच्या काही षटकांत आक्रमक फटके न मारण्याचा निर्णय घेतला होता. रोहित आता मोठी धावसंख्या उभारणार असे वाटत असतानाच भारताच्या डावातील नववे षटक टाकण्यासाठी आलेल्या पॅट कमिंसने एका अप्रतिम चेंडूवर रोहितला यष्टीरक्षक टीम पेनकडे झेल देण्यास भाग पाडले. पेनने उजव्या बाजूला झेप घेत शानदार रोहितचा झेल घेतला.

रोहितने 18 चेंडूत एका चौकारासह 7 धावा केल्या. आयसीसी कसोटी क्रमवारीत प्रथम क्रमांकावर असलेल्या पॅट कमिंसचा रोहित मालिकेतील 18 वा बळी असून तो संपूर्ण मालिकेत अविश्वसनिय कामगिरी करत आहे.

 

दरम्यान शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा भारताने पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्राखेर 38 षटकात 1 गडी गमावत 83 धावा केलेल्या होत्या. शुभमन गिल 64 धावांवर खेळत असून, चेतेश्वर पुजारा 8 धावांवर खेळत आहे. भारताला विजयासाठी अजूनही 245 धावांची गरज असून संघाला लक्ष्य गाठण्यासाठी अविश्वसनीय कामगिरी करावी लागेल.

महत्त्वाच्या बातम्या –

भारतीय संघ या मालिकेत ऑस्ट्रेलियापेक्षा अधिक चांगला खेळला, ‘या’ माजी दिग्गजाने केले कौतुक

असे दोन प्रसंग, जेव्हा भारतीय संघाने चौथ्या डावात यशस्वीरित्या पार केले 300 पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य

आयपीएल २०२१ : सुरेश रैनाला मिळणार चेन्नई संघातून डच्चू?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---