ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स गेल्या काही महिन्यांपासून भारतात चांगलाच चर्चेत आहे. आयपीएल मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळत असतांना भारतातील कोरोनाची चिंताजनक परिस्थिती पाहून त्याने भारताला आर्थिक मदत देऊ केली होती. त्यानंतर त्याने इतर सहकारी खेळाडूंना देखील भारतीय सरकारला आणि भारतीय नागरिकांना मदत करण्याचे आवाहन केले होते.
यामुळे भारतात त्याचे मोठ्या प्रमाणावर कौतुक देखील झाले होते. मात्र आता एका वेगळ्या कारणामुळे तो चर्चेत आला आहे. सोशल मिडीयावर मयंती लँगर या स्पोर्ट्स एंकरला टॅग करण्या ऐवजी त्याने एका भारतीय क्रिकेटपटूलाच टॅग केले. याची चर्चा आता चाहत्यांमध्ये होते आहे.
पॅट कमिन्सची नजरचूक
त्याचे झाले असे की पॅट कमिन्सने युट्यूब वरील ‘प्लेयर्स लाउंज’ या कार्यक्रमात भाग घेतला होता. आपले अनुभव त्याने या कार्यक्रमात शेअर केले. या कार्यक्रमाची एंकर भारताचा अष्टपैलू खेळाडू स्टुअर्ट बिन्नीची पत्नी मयंती लँगर होती. या दोघांमध्ये या कार्यक्रमा दरम्यान भरपूर गप्पा झाल्या आणि त्यांनी काही जुन्या आठवणींना देखील उजाळा दिला.
मात्र कमिन्सने ही गोष्ट सोशल मिडीयावर शेअर करतांना घोळ केला. कमिन्सने ट्विटरवर या कार्यक्रमाची माहिती शेअर केली. त्यावेळी त्याला मयंती लँगरला टॅग करायचे होते. मात्र त्याने नजरचुकीने भारताचा सलामीवीर मयंक अगरवालला टॅग केले.
Good fun chatting to @mayankcricket and @Swannyg66 on the Players Lounge Podcast a couple of weeks back! https://t.co/elURWhdx4v
— Pat Cummins (@patcummins30) May 9, 2021
यानंतर मयंक अगरवालने देखील कमिन्सला मजेशीर उत्तर दिले. त्याने कमिन्सच्या ट्विटला उत्तर देतांना लिहिले की “पॅट, तू चुकीच्या व्यक्तीला टॅग केले आहेस.” मयंती लँगरने देखील मयंक अगरवालच्या या ट्विटवर रिप्लाय दिला. तिने हसण्याचे स्मायली टाकत ‘एपिक’ असा रिप्लाय दिला आहे.
😂😂 #epic
— Mayanti Langer Binny (@MayantiLanger_B) May 9, 2021
महत्त्वाच्या बातम्या –
मास्टरप्लॅन! कर्णधार रिषभ पंतने एमएस धोनीला बाद करण्यासाठी आवेश खानला केली अशाप्रकारे मदत
शेफाली वर्माची बॅट पुन्हा तळपणार, खेळणार इंग्लंडमधील या स्पर्धेत