पुणे। बाऊन्स टेनिस अकादमी व सनी वर्ल्ड यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या सनी स्पोर्ट्स किंगडम-एमएसएलटीए एआयटीए 16वर्षांखालील चॅम्पियनशिप सिरिज 2022 स्पर्धेत महाराष्ट्राच्या अवनीश चाफळे, आदित्य भटवेरा,सक्षम भन्साळी, आर्यन पटेल या खेळाडूंनी आपापला प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात प्रवेश केला.
सनी वर्ल्ड टेनिस कोर्ट, पाषाण सुस रोड येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीत मुलांच्या गटात अवनीश चाफळे याने हर्ष भोसलेचा 9-2 असा तर, आदित्य भटवेरा याने देवब्रत बॅनर्जीचा 9-1 असा सहज पराभव करून आगेकूच केली. आर्यन पटेल व सिद्धांत कुलकर्णी यांनी यशराज जारवाल व वेदांत मानकेश्वर यांचा 9-5 अशा सारख्याच फरकाने पराभव करून विजयी सलामी दिली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली पात्रता फेरी: मुले:
अवनीश चाफळे(महाराष्ट्र)वि.वि.हर्ष भोसले(महाराष्ट्र)9-2;
आदित्य भटवेरा(महाराष्ट्र)वि.वि.देवब्रत बॅनर्जी(महाराष्ट्र)9-1;
कौशिक कचरे(महाराष्ट्र)वि.वि.अनन्मय उपाध्याय(महाराष्ट्र)9-5;
शौर्य बावस्कर(महाराष्ट्र)वि.वि.मोहम्मद शमीन(महाराष्ट्र) 9-1;
आदित्य सुर्वे(महाराष्ट्र)वि.वि.वेदांत खानवलकर(महाराष्ट्र)9-0;
रौनक ललवानी(महाराष्ट्र)वि.वि.अनुराग वैद्यनाथन(महाराष्ट्र)9-0;
सक्षम भन्साळी(महाराष्ट्र)वि.वि.पारस घाडगे(महाराष्ट्र)9-2;
आर्यन पटेल(महाराष्ट्र)वि.वि.यशराज जारवाल(महाराष्ट्र)9-5;
सिद्धांत कुलकर्णी(महाराष्ट्र)वि.वि.वेदांत मानकेश्वर(महाराष्ट्र)9-5;
ओम पाटील(महाराष्ट्र)वि.वि.रोहन बजाज(महाराष्ट्र)9-1;
आर्यन घाडगे(महाराष्ट्र)वि.वि.नचिकेत गोरे(महाराष्ट्र)9-2;
महत्त्वाच्या बातम्या –
एसपी गोसावी मेमोरियल पुणे आंतरक्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत टेनिसनट्स संघाचा सलग दुसरा विजय