पॉंडिचेरीमध्ये सध्या टी-१० लीग खेळली जात आहे. शुक्रवारी (३ जून) पॅट्रियट आणि रॉयल्स यांच्यात एक रंगतदार सामना चाहत्यांना पाहायला मिळाला. सामनावीर ठरलेल्या कृष्णा पांडेच्या प्रदर्शनाच्या जोरावर पॅट्रियटने हा सामन्यात चांगले प्रदर्शन केले. कृष्णाने या सामन्यात अशक्य वाटणारी कामगिरी करून दाखवली. सामन्याच्या दुसऱ्या डावात कृष्णाने एका षटकातील सर्वच्या सर्व सहा चेंडूंवर षटकार मारले.
रॉयल्स संघाने या १० षटकांच्या सामन्यात प्रथम फलंदाजी केली. प्रथम फलंदाजी करताना रॉयल्सने तब्बल १५७ धावा चोपल्या. हे मोठे लक्ष्य गाठण्यासाठी पॅट्रियटचे फलंदाज जेव्हा मैदानात आले, तेव्हा त्यांनी पहिल्या पाच षटकांमध्ये ४१ धावा केल्या होत्या आणि राहिलेल्या पाच षटकात विजयासाठी त्यांना ११७ धावांची आवश्यकता होती. अशात कृष्णा पांडे (Krishna Pandey) याने ताबडतोड फलंदाजीचे प्रदर्शन केले.
https://twitter.com/Cricket04670728/status/1533045511183183872?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1533045511183183872%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.sportstiger.com%2Fwatch-patriots-krishna-pandey-smashes-six-sixes-in-an-over-in-pondicherry-t10-game%2F
सामन्याच्या दुसऱ्या डावात जेव्हा पॅट्रियटला पाच षटकात ११७ धावांची आवश्यकता होती, तेव्हा कृष्णाने डावाच्या सहाव्या षटकात धमाके केला. त्याने या षटकातील प्रत्येक चेंडूवर षटकार मारला आणि नव्या विक्रमाची नोंद केली. नितेश ठाकूर या षटकात गोलंदाजी करत होता, जो कृष्णाच्या धुव्वांधार फलंदाजीचा शिकार ठरला. कृष्णाने या सामन्यात १९ चेंडू खेळले आणि यामध्ये तब्बल ८३ धावा केल्या. यामध्ये त्याचा १२ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.
कृष्णा जरी धमाकेदार प्रदर्शानासाठी या सामन्यात सामनावीर ठरला असला, तरी त्याच्या संघाला हा सामना मात्र जिंकता आला नाही. पॅट्रियट संघाने मर्यादित १० षटकांमध्ये १५३ धावा केल्या आणि अवघ्या चार धावा कमी पडल्यामुळे पराभव स्वीकारला.
दरम्यान भारतीय संघाचा माजी दिग्गज अष्टपैलू युवराज सिंगने पहिल्या टी-२० विश्वचषकात म्हणजेच २००७ साली सहा चेंडूवर सलग सहा षटकार मारण्याचा विक्रम केला होता. तसेच, वेस्ट इंडिजचा कायरन पोलार्ड देखील ही कामगिरी करून बसला आहे. टी-१० क्रिकेटमध्ये ही कामगिरी यापूर्वी देखील केली गेली आहे, पण पांडे इथपर्यंत मजल मारणारा नवीन खेळाडू नक्कीच बनला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तान संघातील वाद चव्हाट्यावर, कर्णधार अन् मुख्य निवडकर्त्यामध्येच ‘या’ खेळाडूवरून खडाजंगी
पाहावे ते नवलंच! पहिल्यांदाच क्रिकेटच्या इतिहासात पाहायला मिळाला भन्नाट शॉट, समालोचकही पडले कोड्यात