ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात शुक्रवारी (21 ऑक्टोबर) पहिल्या फेरीत ब गटामध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध आयर्लंड यांच्यात सामना खेळला गेला. बेलेरिव ओवल, होबार्ट येथे खेळला गेलेल्या या सामन्यात आयर्लंडने बाजी मारली आहे. त्यांनी वेस्ट इंंडिजला तब्बल 9 गड्यांनी पराभूत करत टी20 विश्वचषकाच्या सुपर 12 मध्ये प्रवेश केला. त्यांच्या या विजयाचा नायक नाबाद अर्धशतकी खेळी करणारा अनुभवी सलामीवीर पॉल स्टर्लिंग ठरला.
दोन्ही संघांसाठी करा अथवा मरा अशा असलेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडसमोर 147 धावांचे आव्हान ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडच्या सलामीवीरांनी 4.2 षटकातच धावफलकावर 50 धावा जोडल्या. त्यांचा कर्णधार अँड्रयू बालबर्नी आणि पॉल स्टर्लिंग यांनी पहिल्या विकेटसाठी 45 चेंडूत 73 धावांची भागीदारी रचली. बालबर्नीने 23 चेंडूत 37 धावा केल्या. तसेच स्टर्लिंगने 32 चेंडूतच अर्धशतक पूर्ण केले आहे. त्याने शेवटपर्यंत फलंदाजी करत 48 चेंडूत 66 धावा केल्या. यामध्ये 6 चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. या विजयासह आयर्लंड तेरा वर्षानंतर प्रथमच टी20 विश्वचषकाच्या मुख्य फेरीत खेळताना दिसणार आहे.
आयर्लंडच्या विजयाचा नायक ठरलेल्या पॉल स्टर्लिंगचे हे टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 22 वे अर्धशतक ठरले. आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक अर्धशतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो सहाव्या स्थानी आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्यापेक्षा जास्त अर्धशतके केवळ भारताचा विराट कोहली (34), भारतीय कर्णधार रोहित शर्मा (32), पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (31), ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर (25) व पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान (23) यांनी झळकावली आहेत. स्टर्लिंग याला आयर्लंड क्रिकेटच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वोत्तम क्रिकेटपटू मानले जाते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तान संघाच्या जर्सीत दिसला रोहित शर्मा! पाहा नक्की काय आहे प्रकरण
आशिया चषक 2023 विषयी रॉजर बिन्नींची पहिली प्रतिक्रिया, दिले स्पष्ट उत्तर