रोहित शर्माच्या नेतृत्वात आयपीएलचे ५ विजेतेपद जिंकणारा मुंबई इंडियन्स संघ यंदाच्या १५व्या हंगामात सपशेल फ्लॉप ठरत आहे. या हंगामात त्यांनी खेळलेल्या ५ सामन्यात सलग पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यांना पाचव्या सामन्यात पंजाब किंग्सने बुधवारी (दि. १३ एप्रिल) १२ धावांनी पराभूत केले. मुंबई संघ अजूनही त्यांच्या पहिल्या विजयाची आतुरतेने वाट पाहतायत. अशातच या सामन्यानंतर मुंबई संघाशी जोडलेला सचिन तेंडुलकर ड्रेसिंग रूमपासून ते डगआऊटपर्यंत खेळाडूंना ट्रेनिंग देताना दिसला. सामन्यानंतर सचिनने युवा खेळाडूंपासून वरिष्ठ खेळाडूंपर्यंत सर्वांना टिप्स देत असतो. मुंबई- पंजाब सामन्यानंतर मैदानावर असे काहीसे पाहायला मिळाले, ज्याने स्टेडिअममध्ये उपस्थित प्रेक्षक फक्त हसलेच नाही, तर सर्वांनी टाळ्यांचा कडकडाटही केला.
मुंबईचा दारुण पराभव
या सामन्यात पंजाबने मुंबईविरुद्ध (PBKS vs MI) मोठे आव्हान उभे केले होते. पंजाबचा कर्णधार मयंक अगरवाल (Mayank Agarwal) (५२ धावा) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) (७० धावा) या खेळाडूंच्या अर्धशतकी खेळी तसेच मोठ्या भागीदारीमुळे संघाने ५ विकेट्स गमावत १९८ धावांचा डोंगर उभा केलेला. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई संघ ९ विकेट्स गमावत फक्त १८६ धावाच करू शकला. त्यामुळे मुंबईला हंगामातील सलग ५ सामन्यात पराभवाचा धक्का बसला.
या सामन्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ एकमेकांशी हात मिळवणी करत होते. तेव्हाच पंजाबचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक जाँटी ऱ्होड्सने (Jonty Rhodes) असे काहीसे केले, ज्यामुळे मैदानातील खेळाडूंसोबतच, प्रेक्षकांनाही आपले हसू आवरता आले नाही.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
सचिनचे पाय पकडण्यासाठी ऱ्होडसने खाली केला हात
दक्षिण आफ्रिका संघाचे दिग्गज खेळाडू आणि जगभरातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक जाँटी ऱ्होडस सचिन तेंडुलकरच्या (Jonty Rhodes And Sachin Tendulkar) पाया पडण्यासाठी खाली वाकला. तेवढ्यात सचिनने लगेच खाली झुकत त्याचे हात पकडले. काही सेकंद ऱ्होड्स त्याच्या पाया पकडण्याचा प्रयत्न करत होता, परंतु सचिननेही त्याला पाया पडू दिल्या नाहीत. यातून क्रिकेटची सुंदरता पाहायला मिळाली. ऱ्होड्स सचिनपेक्षा ४ वर्षांनी मोठा आहे. तो ५२ वर्षांचा आहे, तर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) ४८ वर्षांचा आहे. ऱ्होड्स सचिनपेक्षा मोठा असल्यामुळेच कदाचित सचिनने त्याला पाया पडू दिल्या नाहीत.
मुंबईसोबत जोडला गेला होता ऱ्होड्स
जाँटी ऱ्होड्स दीर्घ काळापर्यंत मुंबई इंडियन्स संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये सामील होता. तो संघाचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक होता. २०१७मध्ये त्याने मुंबईची साथ सोडली होती. तो आता पंजाब संघाचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आहे. सचिन मुंबई संघाचा मार्गदर्शक आहे. पंजाबचा प्रशिक्षक अनिल कुंबळेशीही त्याने थोडा वेळ चर्चा केली. यानंतर जेव्हा ऱ्होड्सची वेळ आली, तेव्हा ऱ्होड्सने सचिनशी हातमिळवणी करायची सोडून, त्याचे पाय पकडून नमस्कार करण्याचा प्रयत्न केला, तेव्हाच सचिनने त्याला रोखले.
मुंबई इंडियन्स संघ गुणतालिकेत सध्या १०व्या क्रमांकावर तळाशी आहे. दुसरीकडे पंजाब संघाने ६ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Video: जेव्हा मैदानावर तोंड पाडून बसला सूर्यकुमार, पोलार्डने असे काही करत जिंकली करोडो हृदये
चेंडू सीमापार करण्यात शिखर ‘नंबर वन’; विराट, गेल सारखे खेळाडू पडलेत मागे
रोहितवर बंदीची टांगती तलवार! मुंबई इंडियन्सची ‘ही’ एक चूक पडू शकते भलतीच महागात