---Advertisement---

कागिसो रबाडाला पंजाबकडून पदार्पणाची कॅप, तर कोलकात्यातही एक प्रमुख बदल; पाहा उभय संघ

On: शुक्रवार, एप्रिल 1, 2022 7:15 PM
Shreyas-Iyer-Mayank-Agarwal
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२२चा आठवा सामना शुक्रवारी (०१ एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना रंगणार असून उभय संघ हंगामातील दुसरा विजय नोंदवण्यासाठी झगडताना दिसतील. तत्पूर्वी या सामन्यासाठी भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता नाणेफेक झाली आहे. कोलकाचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी निवडली आहे. त्यामुळे पंजाबचे खेळाडू पहिल्यांदा फलंदाजीसाठी मैदानात उतरतील.

पंजाबकडून कागिसो रबाडा याला पदार्पणाची कॅप दिली गेली आहे. संदिप वॉरियरला बाकावर बसवत त्याला अंतिम एकादशमध्ये जागा दिली गेली आहे. तर कोलकाता संघातही एक प्रमुख बदल करण्यात आला आहे. तो शेल्डन जॅक्सनच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळेल.

कोलकाता नाइट रायडर्सची प्लेइंग इलेव्हन: अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, श्रेयस अय्यर (कर्णधार), सॅम बिलिंग्स (यष्टीरक्षक), आंद्रे रसेल, सुनील नारायण, टीम साऊदी, उमेश यादव, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती

पंजाब किंग्सची प्लेइंग इलेव्हन: मयंक अग्रवाल (कर्णधार), शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, भानुका राजपक्षे (यष्टीरक्षक), शाहरुख खान, ओडियन स्मिथ, राज बावा, अर्शदीप सिंग, हरप्रीत ब्रार, कागिसो रबाडा, राहुल चाहर

महत्त्वाच्या बातम्या-

राजस्थान संघाने चँपियन शेन वॉर्नची काढली आठवण, पदार्पणवीरांना डेब्यू कॅप देताना केली खास अपील

मुंबईच्या थम्पीने रोहितला प्रेमाने पाडलंय नवं नाव; म्हणाला, ‘तो संघात मला…’

याला म्हणतात जिगर! ‘विक्रमवीर’ बाबर आझमचं मोहम्मद कैफने केलं तोंडभरून कौतुक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---