चेन्नई। शुक्रवारी(२३ एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ मध्ये पंजाब किंग्सविरुद्ध मुंबई इंडियन्स संघात सामना झाला. एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईला २० षटकात ६ बाद १३१ धावाच करता आल्या. दरम्यान, पंजाबचा क्रिकेटपटू निकोलस पूरनने या सामन्या क्षेत्ररक्षणावेळी एक अफलातून झेल घेतला.
पूरनचा अफलातून झेल
या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या मुंबई इंडियन्सने १९ व्या षटकापर्यंत केवळ ५ बाद १२५ धावा केल्या होत्या. त्यामुळे अखेरच्या षटकात फलंदाजीसाठी मैदानात असलेल्या कायरन पोलार्ड आणि कृणाल पंड्याकडून सर्वांना मोठ्या फटक्यांची अपेक्षा होती. मात्र, मोहम्मद शमीने उत्तम गोलंदाजी करत या षटकात केवळ ६ धावा दिल्या. त्यात त्याला पूरनने कृणालचा अफलातून झेल घेतल्याने १ विकेटही मिळाली.
कृणाल पंड्याने शेवटच्या षटकातील ५ व्या चेंडूवर मोहम्मद शमीविरुद्ध कव्हर पाँइंटच्या वरुन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याचवेळी डीप-कव्हरला क्षेत्ररक्षण करत असलेला पूरनने धावत येऊन दोन्ही हातांनी हा अफलातूनरित्या चेंडू झेलला. त्यामुळे कृणालला ३ धावांवर बाद व्हावे लागले.
Pooran the boss pic.twitter.com/7A7eAdsb7u
— Christian Thorne (@pipepro246) April 23, 2021
WHAT A CATCH BY #POORAN!
Simply incredible bowling performance from #PBKS!
👏👏👏👏👏👏
And #Mumbai have no answer!#PBKSvMI #PBKSvsMI #MIvPBKS #MIvsPBKS #IPL #IPL2021 pic.twitter.com/aLE7y4EWtn— BlueCap 🇮🇳 (@IndianzCricket) April 23, 2021
मुंबईच्या केवळ १३१ धावा
या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या मुंबई इंडियन्स संघाने सुरुवातीला खुप संयमी खेळ केला होता. त्यातच त्यांनी क्विंटन डी कॉक आणि ईशान किशनच्या विकेट्स स्वस्तात गमावल्या होत्या. मात्र, त्यानंतर रोहित शर्मा आणि सुर्यकुमार यादवने ७९ धावांची भागीदारी करत मुंबईचा डाव सावरला.
पण, ही भागीदारी रंगत असतानाच १७ व्या षटकात रवी बिश्नोईने सुर्यकुमारला ३३ धावांवर ख्रिस गेलकरवी झेलबाद केले. तर १८ व्या षटकात रोहित शर्मा मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर फॅबिएन ऍलेनकडे झेल देऊन बाद झाला. रोहितने ५२ चेंडूत ६३ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ५ चौकार आणि २ षटकार मारले.
रोहितनंतर मुंबईकडून फलंदाजीला आलेल्या हार्दिक आणि कृणाल या पंड्या बंधू आणि कायरन पोलार्डला(१६) मोठे फटके मारण्यात अपयश आले. त्यामुळे अखेर मुंबईला २० षटकात ६ बाद १३१ धावाच करता आल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
पंजाबविरूद्ध फलंदाजीला उतरताच रोहितच्या नावे झाले ‘हे’ खास द्विशतक