बुधवारी (दि. 3 मे) पंजाब किंग्स वि. मुंबई इंडियन्स संघात आयपीएल 2023चा 46वा सामना रोमांचक पद्धतीने पार पडला. या सामन्यात मुंबईने शानदार विजय मिळवला. पंजाबच्या पहिल्या डावानंतर हा सामना जिंकणे मुंबईसाठी कठीण असल्याचे दिसत होते. मात्र, मुंबईच्या विस्फोटक खेळाडूंनी दणदणीत विजय मिळवून दिला. मुंबईने हा सामना 6 विकेट्सने नावावर केला. या सामन्यात पराभूत झाल्यानंतर पंजाबचा कर्णधार शिखर धवन याने मोठी प्रतिक्रिया दिली. तो यावेळी संघाच्या गोलंदाजीवर निराश दिसला.
पंजाबच्या गोलंदाजांनी लुटवल्या धावा
या सामन्यात पंजाब किंग्स (Punjab Kings) संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 3 विकेट्स गमावत 214 धावा केल्या होत्या. पंजाबच्या 215 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने 7 चेंडू शिल्लक ठेवत 216 धावा केल्या. तसेच, हा सामना 6 विकेट्सने जिंकला. यावेळी पंजाबच्या गोलंदाजांनी जास्तच धावा खर्च केल्या. फक्त ऋषी धवन आणि नेथन एलिस यांना चांगली गोलंदाजी करता आली. त्यांच्याव्यतिरिक्त अर्शदीप सिंग याने 3.5 षटकात 66 धावा खर्च केल्या. तसेच, सॅम करन याने 3 षटकात 41 धावांची लुटवल्या. राहुल चाहर (30) आणि हरप्रीत ब्रार (21) यांनीही धावा खर्च केल्या.
काय म्हणाला शिखर धवन?
सामना गमावल्यानंतर शिखर धवन (Shikhar Dhawan) म्हणाला की, “आम्ही खूप चांगली सुरुवात केली आणि विचार केला की, ही एक चांगली धावसंख्या होती. मात्र, दुर्दैवाने आम्हाला याचा बचाव करता आला नाही. मला वाटते की, नक्कीच ऋषी धवनने चांगली गोलंदाजी केली. मात्र, दुसरीकडे, आम्ही ऑफच्या बाहेर गोलंदाजी करत राहिलो. आम्हाला पॉवरप्लेमध्ये थोडी स्टंप आणि ऑफवर गोलंदाजी करायला पाहिजे होती.”
Ishan Kishan is adjudged Player of the Match for his match winning knock of 75 as @mipaltan win by 6 wickets 👏👏
Scorecard – https://t.co/QDEf6eqX22 #TATAIPL #PBKSvMI #IPL2023 pic.twitter.com/mxWT55vICt
— IndianPremierLeague (@IPL) May 3, 2023
खेळपट्टीबाबत बोलताना धवन म्हणाला की, “ही एक चांगली खेळपट्टी होती. आम्ही विचार केला की, बदलाची गती खूप कामी येईल. नेथनने वास्तवात चांगली गोलंदाजी केली. मात्र, इतर गोलंदाज खास चमकले नाहीत. मैदानावर दव होते आणि खेळपट्टी जरा चांगली झाली. मला वाटले की, जर एका फिरकीपटूविरुद्ध फटकेबाजी झाली, तर धावा रोखणे कठीण होते.”
मुंबईची फलंदाजी
मुंबईकडून फलंदाजी करताना ईशान किशन याने 41 चेंडूत 75 धावा केल्या. तसेच, सूर्यकुमार यादव याने 31 चेंडूत 2 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने 66 धावांची वादळी खेळी साकारली. दोघेही बाद झाल्यानंतर तिलक वर्मा याने 10 चेंडूत नाबाद 26 आणि टीम डेविड याने 10 चेंडूत 19 धावांची नाबाद खेळी खेळून 7 चेंडू शिल्लक ठेवत 6 विकेट्सने विजय मिळवला. (pbks vs mi skipper shikhar dhawan gave statement on bowlers after crushing defeat)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘जे कोणी असेल बंदी घाला…’, विराट-गंभीर अन् नवीन वादावर सेहवागचे रोखठोक विधान, वाचा सविस्तर
विराटला नडणाऱ्या नवीनला पाकिस्तानातून पाठिंबा; आफ्रिदी म्हणाला, ‘तो स्वत: आधी भांडतच…’