---Advertisement---

PBKS vs MI: ‘हा’ ठरला पंजाबच्या विजयाचा टर्निंग पॉईंट!

On: मंगळवार, मे 27, 2025 9:09 AM
---Advertisement---

आयपीएलचा 69वा सामना पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स या दोन संघात (26 मे) रोजी सवाई मानसिंग स्टेडियम वरती खेळवला गेला. पंजाब किंग्सने 7 विकेट्स ने सामना आपल्या नावावरती केला आहे.

पंजाब किंग्सचे फलंदाज प्रियांश आर्य आणि जोश इंग्लिस यांनी शतकी भागीदारी करत सामना मुंबईपासून दूर नेला. प्रियांश आणि जोश इंग्लिस यांनी अर्धशतकी खेळी केल्या. प्रियांश आर्य याने 35 चेंडूत 62 धावा करत 9 चौकार आणि 2 षटकार अशी खेळी केली, त्याच बरोबर जोश इंग्लिसने 42 चेंडूत 73 धावा केल्या. अशी धमाकेदार पारी खेळत या दोघांनी मुंबई इंडियन्सपासून हा सामना दूर नेला. याशिवाय पहिल्या डावात पंजाब किंग्सच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत मुंबईच्या धावांवर अंकुश ठेवला. या पराभवासह मुंबईचा संघ चौथ्या स्थानीच राहणार आहे. पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सविरूद्धचा सामना एकतर्फी करत संघाला सामन्यात परण्याची संधीच दिली नाही. हा पंजाब साठी मोठा टर्निंग पॉईंट ठरला आहे. (Turning point of the match).

जयपूरमध्ये खेळल्या गेलेल्या दोन्ही संघांच्या लीग टप्प्यातील शेवटच्या सामन्यात, पंजाबने अर्शदीप सिंगच्या उत्कृष्ट गोलंदाजी आणि प्रियांश आर्य-जोश इंग्लिसच्या जोरदार प्रतिआक्रमणाच्या जोरावर 19 षटकांत 185 धावांचे लक्ष्य गाठले.

पंजाबने 7 विकेट्सने मुंबईचा पराभव करत आता संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानी पोहोचला आहे. आरसीबीचा अखेरचा सामना आता लखनौ सुपर जायंट्स संघाविरूद्ध असणार आहे. पण पंजाबने क्वालिफायर वनसाठी आपली जागा निश्चित केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---