पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) सोमवारी इंग्लंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेचे (PAK vs ENG) वेळापत्रक जाहीर केले. तब्बल १७ वर्षांनंतर प्रथमच इंग्लिश संघ पाकिस्तानमध्ये कसोटी सामना खेळणार आहे. पाकिस्तानमध्ये १ डिसेंबरपासून तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील तीन सामन्यांसाठी रावळपिंडी, मुलतान आणि कराची ही ठिकाणे निवडण्यात आली आहेत. ही मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत खेळवली जाईल.
इंग्लंडला पाकिस्तानचा दौरा दोन टप्प्यात पूर्ण करायचा आहे. पहिल्या टप्प्यात सात टी-२० सामन्यांसाठी संघ येणार आहे. यानंतर डिसेंबरमध्ये दुसरा टप्पा सुरू होईल आणि या टप्प्यात कसोटी सामने खेळवले जातील.
पाकिस्तान विरुद्ध इंग्लंडच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक
पहिली कसोटी – १ ते ५ डिसेंबर, रावळपिंडी
दुसरी कसोटी – ९ ते १३ डिसेंबर, मुलतान
तिसरी कसोटी – १७ ते २१ डिसेंबर, कराची
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
आशिया चषकादरम्यान ‘हे’ भारतीय दिग्गज करतील हिंदी भाषिकांचे मनोरंजन, पाहा संपूर्ण यादी
WBC 2022: अश्विनी-सिक्की आणि तनिषा-ईशानची विजयी सुरुवात, प्रणितच्या नशीबी निराशा





