मुंबई । पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी देशात मॅच फिक्सिंगला गुन्हा ठरविण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. नव्या संहितेनुसार बोर्ड मॅच फिक्सिंग आणि स्पॉट फिक्सिंग आता कायद्याने गुन्हा ठरणार आहे. गुन्हा सिद्ध झाल्यास तुरुंगवासाची शिक्षा देखील भोगावी लागणार आहे. यासोबत आर्थिक दंडही ठोठावला जाईल.
आयसीसीच्या या नियमात शिक्षेची तरतूद अत्यंत कमकुवत आहे. भ्रष्टाचारासंदर्भात दोषी आढळल्यास आयसीसी कारवाई करते. शिक्षा भोगल्यानंतर पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करून येऊ शकतो, असा समज अनेक खेळाडूंचा झाला आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीसीबीचे अध्यक्ष एहसान मनी हे इंग्लंड दौऱ्याच्या परवानगीसाठी इम्रान खान यांच्याशी भेट घेतली. तेव्हा या नव्या कायद्याला इम्रान खान यांनी हिरवा कंदील दाखवला आहे.