आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी अवघे काही महिनेच शिल्लक राहिले आहे. अशात अनेक क्रिकेट संघाने आपला १५ सदस्यीय संघ देखील जाहीर केला आहे. नुकतेच पाकिस्तानने देखील टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी आपल्या १५ सदस्यीय संघ जाहीर केला होता. ज्यानंतर पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक मिसबाह उल हक आणि गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनूस यांनी आपल्या पदावरून राजीनामा दिला. यानंतर पाकिस्तान क्रिकेटबाबत अनेक चर्चांना उधाण आले.
यानंतर आता आणखी एक चर्चा सुरू आहे ती म्हणजे, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम टी-२० संघासाठी निवडण्यात आलेल्या १५ सदस्यीय संघाला घेऊन खूश नाही. याबाबत आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे (पीसीबी) कार्यकारी अधिकारी वसीम खान यांनी वक्तव्य केले आहे.
सोशल मीडियावर होत असलेल्या या चर्चांवर बोलताना वसीम खान बुधवारी (८ सप्टेंबर) म्हणाले, “पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या संघावर नाराज असल्याची चर्चा एकदम चुकीची आहे. तसेच बाबर अझम ज्या मार्गाने जात आहे, त्याला आमचा पाठिंबा देखील आहे.”
“तसेच गेल्या काही दिवसात आमच्या लक्षात आले की, पाकिस्तान क्रिकेटशी संबंधित क्रिकेट जगतात काही चुकीची चर्चा प्रसारित होत आहे. मात्र, आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या १५ सदस्यीय संघावर कर्णधार बाबर अझम पूर्ण सहमत आहे,” असेही वसीम खान म्हणाले.
तसेच मंगळवार (७ सप्टेंबर) पाकिस्तानच्या काही खेळाडूंची माजी कर्णधार राहिलेल्या आणि पीसीबी बोर्ड ऑफ गव्हर्नन्सचे सदस्य रमीज राजा सोबत सकारात्मक चर्चादेखील केली. यादरम्यान क्रिकेटशी संबंधित सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यामुळे उठत असलेल्या या चर्चा एकदम चुकीचे असल्याचे वसीम खान यांनी सांगितले. आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी आम्ही पूर्णपणे संघासोबत उभे असल्याचे देखील सांगितले.
महत्वाच्या बातम्या –
–‘ज्यांना वर्षानुवर्षे हरवलं, त्यांच्यासमोर करावा लागतोय संघर्ष’, माजी इंग्लिश कर्णधाराचा घरचा आहेर
–“तर शार्दुल कपिल देव नंतर भारतीय संघात असलेली अष्टपैलू खेळाडूची समस्या सोडवू शकतो”
–भारत-इंग्लंड संघात पुढीलवर्षी खेळवली जाणार एकदिवसीय आणि टी-२० मालिका; असे आहे वेळापत्रक