पाकिस्तानचा प्रमुख वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी हा सध्या इंग्लंडमध्ये उपचार घेत आहे. आशिया चषक स्पर्धेआधी नेदरलँडमध्ये त्याला दुखापत झाली होती. या दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्यासाठी तो इंग्लंडमध्ये आहे. मात्र, तेथील सर्व खर्च त्याला उचलावा लागत असल्याचा खुलासा पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याने केला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड शाहीनच्या शस्त्रक्रियेचा कोणताही खर्च उचलत नसल्याचा आरोप त्याने केला.
शाहीन आफ्रिदी याला नेदरलँडमध्ये गुडघ्याची दुखापत झाली होती. यानंतरही तो आशिया चषकासाठी संघासह युएईमध्ये पोहोचला होता. स्पर्धा अर्ध्यात आली असताना त्याने शस्त्रक्रियेसाठी इंग्लंडला जाण्याचा निर्णय घेतला. आता याच प्रकरणी पाकिस्तानचा माजी कर्णधार व शाहीनचा होणारा सासरा शाहिद आफ्रिदी याने धक्कादायक खुलासे केले.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना तो म्हणाला,
“शाहीन आफ्रिदी स्वतःहून इंग्लंडला गेला होता. त्याने स्वखर्चाने इंग्लंडला जाण्याचे तिकीट काढले. तर मी डॉक्टरांची व्यवस्था केली. पीसीबीने त्यांच्यासाठी काहीही केले नाही. सध्या पाकिस्तानचा सर्वात यशस्वी गोलंदाज शाहीनसाठीही पीसीबीकडे पैसे नाहीत असे दिसते.”
शस्त्रक्रियेनंतर शाहीन पुनर्वसनातून जात असून, टी20 विश्वचषकापूर्वी ती पूर्णपणे तंदुरुस्त होईल. पीसीबीने टी20 विश्वचषकासाठी पाकिस्तान संघाची घोषणा केली असून, शाहीन आफ्रिदी संघाचा भाग आहे. मागील वर्षी झालेल्या विश्वचषकात पाकिस्तानला उपांत्य फेरीपर्यंत नेण्यात त्याचा मोठा वाटा होता.
सध्या केवळ 22 वर्षांचा असलेला शाहीन मागील वर्षी आयसीसीचा सर्वात्कृष्ट क्रिकेटपटू ठरला होता. त्याने आपल्या टी20 कारकिर्दीत 40 सामने खेळताना 47 बळी मिळवले आहेत. तसेच यावर्षी लाहोर कलंदर्सने त्याच्याच नेतृत्वात पाकिस्तान सुपर लीगचे विजेतेपद पटकावले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
ब्रेकिंग! टी20 विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ जाहीर, स्टार वेगवान गोलंदाजाचा समावेश
‘या’ कारणांमुळे हुकली रसेल-नरीनची वर्ल्डकप वारी; निवडकर्ते म्हणतायेत, “आता ते…”
पंधरा वर्षांचा दुष्काळ संपवत भारत उंचावेल का टी20 विश्वचषक? महान कर्णधाराने वर्तवले भाकित