भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना म्हणजे जणू क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणीच असते. या सामन्याच्या काही दिवस आधीच तिकिटांची विक्रमी विक्री होते. कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या या संघांमधील सामन्याला हायव्होल्टेज सामना म्हटले जाते. आता हे दोन्ही संघ टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत एकमेकांशी भिडणार आहेत. त्यांच्यातील हा सामना 23 ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. मेलबर्न येथे होणाऱ्या या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. या सामन्यात दबाव कोणावर असतो आणि कुणाला जास्त भीती वाटते, हे जाणून घेण्यासाठी चाहतेही नेहमीप्रमाणेच उत्सुक आहेत. याचे उत्तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीज राजा यांनी दिले आहे.
बाबर आझम याला विचारली योजना
रमीज राजा (Ramiz Raja) यांनी त्यांच्या टी20 विश्वचषकाच्या अभियानासाठी रवाना होण्यापूर्वी पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याच्याशी चर्चा केली होती. रमीजने बाबरला भारताविरुद्धचा सामना आणि भारतीय कर्णधार रोहित शर्मा यांच्याविरुद्ध काय योजना असेल? असा प्रश्न विचारला होता. यावरून असे म्हटले जाऊ शकते की, भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तान संघ घाबरतो.
रमीज राजा यांनी सांगितली रोहितला बाद करण्याची पद्धत
रमीज राजा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “विश्वचषकासाठी रवाना होण्यापूर्वी बार आझम मुख्य निवडकर्त्यांसोबत इथे उपस्थित होता. त्यावेळी मी त्याला विचारले होते की, भारताविरुद्ध तुझी योजना काय आहे? मी तुम्हाला सांगू शकतो की, आता रोहित शर्मापासून कशाप्रकारे सुटका मिळू शकते. यासाठी बाबरही खूपच उत्सुक होता.”
“मी म्हणालो की, शाहीन शाह आफ्रिदी ताशी 160.93 किमीच्या गतीने गोलंदाजी करतो. त्यावेळी एक क्षेत्ररक्षकाला शॉर्ट लेगवर उभे कर. त्यानंतर याच गतीचा इनस्विंग यॉर्कर टाकायला सांग. एकेरी धावा घेऊ देऊ नका. रोहितला स्ट्राईकवरच ठेवा. तुम्ही त्याला बाद कराल,” असे पुढे बोलताना रमीज राजा म्हणाले.
रमीज राजा यांनी दिलेला हा सल्ला पाकिस्तान संघासाठी किती फायदेशीर ठरतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अर्रर्र, आता कसं होणार! कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध भिडण्यापूर्वीच रिषभ पंत जखमी? फोटो व्हायरल
ममता बॅनर्जींचा गांगुलीला पाठिंबा; म्हणाल्या, ‘सौरवने स्वत:ला सिद्ध केलंय, मोदीजी…’