मुंबई । कोरोनाच्या सावटात श्रीलंका देशात लवकरच क्रिकेटच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. पीडीसी टी 10 लीगला 25 जूनपासून सुरुवात होईल. या लीगमध्ये श्रीलंकेच्या राष्ट्रीय संघातील काही खेळाडू सहभागी होणार आहेत.
12 दिवस चालणाऱ्या या लीगमध्ये एकूण 8 संघांचा समावेश असून त्यांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. लीगमध्ये एकूण 46 सामने होतील.
या लीगमध्ये तिलन तुषारा मिरांडो, इशारा अमेरासिंघे, अजंता मेंडिस, चमारा सिल्वा, नुवान कुलसेखरा, असेला गुणरत्न, धम्मिका प्रसाद, सचित्रा सेनानायके, चमारा कपुगेदरा हे खेळाडू सहभागी होणार आहेत.
हरिकेन ब्लास्टर्स, स्पार्टन हीरोज, पॉवर ग्लॅडिएटर्स, चिलो वारियर्स, पुटलुम स्टार्स, ग्लोबल राइडर्स, रॉयल लायन्स आणि जायंट लीजेंड्स या संघांना दोन गटांत विभागण्यात आले आहे
ग्रुपमधील सामने रोबिन लीग पद्धतीने खेळविण्यात येतील. त्यानंतर क्वालिफायर आणि एलिमिटरचे सामने देखील होतील. शेवटी अंतिम सामना खेळवला जाईल.