पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित PDEA SHREE 2018 या स्पर्धेमध्ये बाबुरावजी घोलप महाविद्यालयाचा कुंजीर केतन चंद्रकांत हा पीडीइए ज्युनिअर श्री 2018 तर सिंहगड महाविद्यालाचा चोपडे संचिन अरूण पीडीइए सिनीअर श्री 2018 हे दोघे टायटल विनर ठरले आणि 10,000 रूपयांचे रोख बक्षिस मिळविले.
शरीर सौष्ठवाचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोचावे, शरीर सौष्ठव स्पर्धेला उच्च दर्जा प्राप्त होऊन मोठया संख्येने त्या मध्ये सहभाग घेतला जावा या उद्देषाने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने आदरणीय पद्मविभूषण मा. शरदचंद्रजी पवारसाहेब मा. कृषीमंत्री, भारत सरकार यांचे क्रीडा क्षेत्रातील भरीव योगदानाचे औचित्य साधून मामासाहेब मोहोळ महाविद्यालय, पौड रोड पुणे 38 येथे PDEA SHREE 2018 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे क्रिडा मंडळ संचालक डाॅ. दिपक माने, शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्री. महादेव सकपाळ, विरोधी पक्षनेते श्री. चेतन तुपे, भारत श्री योगेष जाधव, श्री. जयदेव गायकवाड,श्री. दिपक मानकर, मा. विवेक वळसे पाटील उपस्थित होते.
या बरोबरच पुणे जिल्हा षिक्षण मंडळाचे मानद सचिव अॅड. संदीप कदम, खजिनदार मा. अॅड. मोहनराव देषमुख, उपसचिव मा. एल. एम. पवार, प्राचार्य एम. जी. चासकर, प्राचार्य डाॅ. सुषमा भोसले,प्राचार्य डाॅ. नितीन घोरपडे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने स्पर्धेला सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्थेचे मानद सचिव मा. अॅड. संदीप कदम उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. तसेच ही स्पर्धा घेण्यामागचा उद्देश सांगितला. गेली 2 वर्षे संस्था ही स्पर्धा आयोजित करीत असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. शरीर सौष्ठव स्पर्धा महत्त्वाची असून त्यातून करीयर करता येते याची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत जावी या हेतूने ही स्पर्धा घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे म.न.पा. विरोधी पक्षनेता श्री. चेतन तुपे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने अशा प्रकारच्या स्पर्धा आयेाजित केल्याबद्दल आभार व्यक्त केले. मानवी जीवनात व्यायामाला मोठे महत्त्व असून हा खेळ शरीर सुदृढ आणि प्रमाणबध्द ठेवणे शिकवतो असे सांगून त्यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
यानंतर विधानपरिषद आमदार श्री. जयदेवजी गायकवाड यांनी उपस्थितांशी संवाद साधताना आपल्याला अशा कार्यक्रमास येण्याची संधी मिळाली. याविषयी आनंद व्यक्त केला. शरीर सौष्ठव हा एक आनंद असून व्यक्तिमत्वातील शरीर हे महत्त्वाचे साधन असून त्यासाठी अशा स्पर्धा उपयोगी असल्याचे सांगितले.
डाॅ. दीपक माने यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेचे जाहीर आभार मानले. संस्थेने अशा प्रकारचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आणि खेळाडूंना शरीराचे योग्य रितीने प्रदर्शन करून देण्याची संधी उपलब्ध करून दिली. या खेळासंदर्भात धोरण निश्चित करून जास्त विद्यार्थ्यांना याचा फायदा करून देण्यासाठी प्रयत्नात आहोत असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. हरिदास खेसे आणि यांनी तर आभार प्रदर्शन प्राचार्य डाॅ. नितीन घोरपडे यांनी केले.
या स्पर्धाचे नियोजन संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. अजित पवार यांच्या मार्गदर्षनाखाली पु. जि. षि. मं.चे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव अॅड. संदीप कदम, खजिनदार मा. अॅड. मोहनराव देषमुख, उपसचिव मा. एल. एम. पवार, यांनी आजीव सदस्य, प्राचार्य, मुख्याध्यापक, षिक्षक व षिक्षकेतर वृंद, विद्यार्थी यांच्या सहकार्याने केले. सद स्पर्धेला मोठा प्रतिसाद असून यामध्ये पुणे, नगर, नाषिक जिल्हयातील स्पर्धक सहभागी झाले होते.