पुणे : बोईसर (पालघर) येथे सुरू झालेल्या वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (विफा) कनिष्ठ आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धेसाठी पीडीएफएकडून पुणे संघाची घोषणा करण्यात आली असून बचावपटू संज्वी ओसवाल हिच्याकडे नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आली आहे.
1 ते 6 जून 2024 दरम्यान रंगणाऱ्या स्पर्धेसाठी मिडफिल्डर तेजस्विनी थाप्पा हिला पुणे संघाच्या उपकर्णधारपदी नियुक्त करण्यात आले आहे.
पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेचे (पीडीएफए) मानद सचिव प्रदीप परदेशी यांनी 15 दिवस चाललेल्या निवडचाचणीनंतर 18 सदस्यीय संघाची घोषणा केली.
पुणे संघ सलामीचा सामना रविवारी (2 जून 2024) हिंगोली-अमरावती विरुद्ध खेळेल.
दरम्यान, पुणे संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी पार्था सैकिया यांची निवड करण्यात आली आहे. व्यवस्थापक म्हणून अमिषा पटेल संघासोबत आहेत.
कनिष्ठ आंतरजिल्हा फुटबॉल नॉकआऊट स्पर्धेत महाराष्ट्रातील एकूण 22 जिल्हा संघांचा समावेश आहे.
पुणे संघ: संज्वी ओसवाल (कर्णधार), रिद्धिमा सारडा, नवमी शानबाग, समृद्धी राठी, समृद्धी मराठे, तनिष्का देवरे, कीया तेलंग, दिया शेरी, तेजस्विनी थाप्पा (उपकर्णधार), याशिका तेजवानी, श्वेता सुर्यवंशी, रिया जांगीड, तीर्थ सैलियन, इपशिता गवारी, अँजेला गुट्टल, आर्या चौधरी, तनिषा अजमेरा, शीन शर्मा.
मुख्य प्रशिक्षक: पार्था सैकिया. व्यवस्थापक: अमिषा पटेल.