---Advertisement---

VIDEO: पोलंडविरुद्ध पेनल्टी ‘मिस!’ विश्वचषकात मेस्सीचा नकोसा, तर गोलकिपरच्या नावावर भन्नाट रेकॉर्ड

Lionel Messi vs Poland
---Advertisement---

अर्जेंटिना आणि पोलंड गुरूवारी (1 डिसेंबर) समोरा-समोर आहे. हा सामना अर्जेटिंनाने 2-0 असा जिंकत फिफा विश्वचषक 2022च्या अंतिम 16मध्ये स्थान पक्के केले. पोलंड बाहेर जाणार का अशी स्थिती असताना सौदी अरेबियाने मेक्सिकोविरुद्ध 95व्या मिनिटाला गोल केला आणि पोलंडदेखील उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला. हा सामना मेक्सिकोने 2-1 असा जिंकला. पोलंडविरुद्धच्या सामन्यात अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सी याने विश्वचषकातील नकोसा विक्रम आपल्या नावावर केला.

नेमके काय झाले?
पोलंडविरुद्ध 39व्या मिनिटाला मेस्सीकडे पेनल्टीमार्फत गोल करण्याची संधी होती, मात्र पोलंडचा गोलकिपर वोज्शिच स्झेस्नी (Wojciech Szczesny) याने तो उत्तमरित्या वाचवला. यामुळे मेस्सी हा विश्वचषकातील पहिलाच खेळाडू ठरला ज्याच्या दोन पेनाल्टीचे गोलमध्ये रुपांतर झाले नाही.

महत्वाचे
मेस्सी पहिला खेळाडू ठरला ज्याला तीन पैकी दोन पेनल्टीमध्ये गोल (पेनाल्टी शूटआऊट वगळून) करण्यात आलेले नाही. याबरोबर त्याने विश्वचषकात सर्वाधिक वेळा पेनल्टी गोल गमावण्याच्या किमान 1966 पासूनच्या खेळाडूची बरोबरी केली (घानाच्या असामोह ग्यान याच्या चारपैकी दोन चुकल्या) Most Penalty Missed in FIFA World Cup

पोलंडचा गोलकिपर स्झेस्नीचाही विक्रम-
त्याचबरोबर 1986 मध्ये ब्राझील विरुद्ध फ्रान्ससाठी जोएल बॅट्स नंतर, विश्वचषक स्पर्धेत पेनल्टी वाचवणारा वोज्शिच स्झेस्नी हा विक्रमी दुसरा गोलकिपर आहे (1966 पासून).

अर्जेंटिना विरुद्ध पोलंड-
ग्रुप सी च्या या साखळी सामन्यातील पहिल्या सत्रात एकही गोल झाला नाही. दुसऱ्या सत्रात अर्जंटिनाने आक्रमक खेळ केला आणि

त्याचा परिणाम म्हणून 46व्या मिनिटाला अर्जेंटिनाने गोल करत सामन्यात आघाडी केली. हा गोल ऍलेक्सिस मॅक ऍलिस्टर (Alexis Mac Allister) याने मोलिगा याच्या असिस्टवर केला. अर्जेटिनासाठी दुसरा गोल जूलियन अल्वारेज (Julián Álvarez) याने केला. 67व्या मिनिटाला केलेल्या गोलसाठी त्याला एन्झो फर्नांडीझ याने असिस्ट केले.

या सामन्यात मिळवलेल्या विजयाने अर्जेंटिना अंतिम 16मध्ये पोहोचला. दुसरीकडे सौदी अरेबियाने मेक्सिकोविरुद्ध 95व्या मिनिटाला गोल केल्याने पोलंडही अंतिम 16मध्ये पोहोचला. मेक्सिकोने हा सामना 2-1 असा जिंकला. Penalty ‘miss’ against Poland! Unwanted record on Messi’s name in the FIFA World Cup

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वाढदिवस विशेष – क्रिकेटर मोहम्मद कैफ
कट्टर प्रतिस्पर्धी मुंबई सिटी एफसी आणि एफसी गोवा आज आमनेसामने

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---