भारतीय संघातील खेळाडू सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय बनून असतात. त्यांची मैदानातील कामगिरी आणि मजेशीर व्हिडिओ आपल्याला नेहमीच पाहायला मिळत असतात. परंतु असंख्य चाहत्यांना जाणून घ्यायचे असते की, ड्रेसिंग रूममध्ये काय घडत आहे. अजिंक्य रहाणेचा ड्रेसिंग रूममधील एक मजेशीर किस्सा आहे, जो क्वचितच लोकांना माहीत आहे. ज्याचा खुलासा स्वतः ‘हिटमॅन’ रोहित शर्माने केला आहे
भारतीय संघाचा आक्रमक सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने दिलेल्या मुलाखतीत अजिंक्य रहाणेचा एक मजेशीर किस्सा सांगितला होता. ही गोष्ट २०१५ ची आहे,जेव्हा भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यावर त्याला एका क्रिकेट चाहत्याने कीस केले होते.
भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळवल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात हा किस्सा घडला होता. या चाहत्याचे नाव पर्सी एबेसेकरा होते. लंच ब्रेकच्या वेळी तो ड्रेसिंग रूमच्या बाहेरच होता. त्यावेळी त्याने भारतीय खेळाडूंसोबत मस्ती केली होती. तसेच विराट कोहली सोबत डान्स ही केला होता.
रोहित शर्माने,’ व्हॉट द डक ‘ या यूट्यूब शोमध्ये हा किस्सा सांगितला होता. तो म्हणाला की, ” पर्सीने रहाणेला आपल्या जवळ बोलवले आणि त्याला भारतीय पद्धतीत कीस केले. पर्सीने असे ही म्हटले होते की, त्याला अनेक कारणांमुळे खेळाडूंना कीस करायला आवडते. मी रहाणेला म्हटले होते की, पर्सी तुझा खूप मोठा चाहता आहे. त्याला तुला भेटायचे आहे आणि भेटून तुला मिठी मारायची आहे.” पर्सी जरी श्रीलंकन संघाचा प्रशंसक असला तरी देखील त्याने भारतीय क्रिकेटपटूंसोबत खूप मस्ती केली होती.
येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान भारतीय आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर, भारतीय संघाला इंग्लंड संघाविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. अजिंक्य रहाणे या भारतीय संघाचा उपकर्णधार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
धोनी तो धोनीच !! इंग्लंडला जाण्यापूर्वी ‘या’ खेळाडूने खास फोटो पोस्ट करत काढली माहीची आठवण
तयारी कसोटी चॅम्पियनशीप पटकावण्याची! पाहा खेळाडू क्वारंटाईनमध्ये कशी घेतायेत तंदुरुस्तीची काळजी
बालपणीच्या शाळेतील शिक्षकाला लैंगिक अत्याचाराच्या प्रकारांत अटक होताच अश्विनने केले ‘असे’ ट्विट