सध्या लंडनमध्ये द हंड्रेड स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेमध्ये १०० चेंडूचा एक डाव खेळला जातो. या स्पर्धेत भारतीय महिला खेळाडूंनी देखील सहभाग घेतला आहे. त्याचबरोबर या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच भारतीय महिला खेळाडू खूप चांगली कामगिरी करत आहेत. यामध्ये जेमिमा रोड्रिग्ज, स्मृति मंधाना आणि हरमनप्रीत कौर यांनी या स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. त्याचबरोबर ‘लेडी सेहवाग’ म्हणून ओळखली जाणारी शेफाली वर्माने देखील सावकाश सुरुवात केली. परंतु नंतर ती देखील आता लयीमध्ये दिसून येत आहे.
याव्यतिरिक्त दीप्ती शर्मा देखील ही स्पर्धा खेळत आहे. तिने आपल्या कामगिरीच्या जोरावर कठीण परिस्थितीत संघाला सामने देखील जिंकले आहेत. आतापर्यंत झालेल्या स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत पहिल्या दहापैकी दोन भारतीय खेळाडू आहेत. यामध्ये जेमीमा आणि हरमनप्रीत यांचा समावेश आहे. त्यापैकी जेमिमा ही पहिल्या स्थानावर आहे. आपण या ५ भारतीय महिला खेळाडूंच्या द हंड्रेड स्पर्धेतील आपापर्यंतच्या कामगिरीचा आढावा घेऊया…
१) जेमिमा रोड्रिग्ज- या स्पर्धेत नॉर्दर्न सुपरचार्जर्सकडून खेळणारी जेमिमा रोड्रिग्जने आतापर्यंत २ सामने खेळली असून यामध्ये तिने एकूण १५२ धावा केल्या आहेत. या दरम्यान तिची सरासरी १५२ होती आणि तिचा स्ट्राइक रेट १८१ होता. दरम्यान नाबाद ९२ धावांची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी राहिली आहे. तिने संघाला दोन्ही सामने जिंकवून दिले आणि दोन्ही वेळा ती सामनावीर ठरली आहे.
२) स्मृती मंधाना- सदर्न ब्रेव संघाकडून खेळणाऱ्या स्मृती मंधानाने आतापर्यंत ३ सामने खेळले आहेत. तिने तिन्ही डावांमध्ये ३३ च्या सरासरीने ६६ धावा केल्या. यादरम्यान तिचा स्ट्राइक रेट १४८.७८ होता. मंधानाला पहिल्या सामन्यात खाते उघडता आले नाही, पण पुढच्या सामन्यात तिने नाबाद ६१ धावांची खेळी केली आणि तिच्या या नाबाद खेळीने संघाला सामना जिंकून दिला.
३) हरमनप्रीत कौर- भारतीय महिला खेळाडू हरमनप्रीत कौरचा जबरदस्त फॉर्म द हंड्रेड स्पर्धेमध्येही कायम दिसून येत आहे. तिने आतापर्यंत २ सामने खेळले असून ७८ च्या सरासरीने ७८ धावा केल्या आहेत. या दरम्यान तिचा स्ट्राइक रेट १२३.८० होता. हरमनप्रीतची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद ४९ आहे.
४) शेफाली वर्मा- भारतीय संघाची युवा सलामीवीर फलंदाज शेफाली वर्मा हळूहळू लयीत येत आहे. तिने ३ सामन्यात १३.६६ च्या सरासरीने ४१ धावा केल्या आहेत. तिचा स्ट्राईक रेट ८२.६० होता आणि सर्वोत्तम २२ धावा केल्या आहेत.
५) दीप्ती शर्मा – अष्टपैलू दीप्ती शर्मा फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये फॉर्ममध्ये दिसली आहे. फलंदाजीमध्ये दीप्तीने ३ सामन्यांत ३२ धावा केल्या. त्याचबरोबर तिने गोलंदाजी करत कामगिरी केली आहे. यामध्ये तिने आतापर्यंत एकूण ५५ चेंडू टाकले आहेत, ज्यामध्ये त्याने १.३० च्या सरासरीने धावा देत ३ बळी घेतले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
व्वा रे पठ्ठ्या! मिचेल स्टार्कच्या भावाने टोकियो ऑलिंपिकमध्ये दाखवला दम, मिळवले फायनलचे तिकीट
एक वर्ष बंदी आणि ३८ लाखांचा दंड, बायो बबल तोडणाऱ्या ‘त्या’ श्रीलंकन खेळाडूंवर कारवाई
धवन ब्रिगेडमधील ‘या’ क्रिकेटरसाठी बंद झाला टी२० विश्वचषकाचा मार्ग? पुरेपूर संधी मिळूनही झाला फ्लॉप