भारताचा द वॉल असणारा राहुल द्रविडने आज एका मुलाखतीत अनेक गोष्टींवर भाष्य केले. तो त्याच्या मार्गदर्शकाच्या भूमिकेबद्दलही भरभरून बोलला. त्याचबरोबर आयसीसीने केलेल्या बॅटच्या नवीन नियमाविषयीही त्याने भाष्य केले.
सध्या भारतीय अ संघाचा आणि १९ वर्षांखालील संघाचा मार्गदर्शक असणारा राहुल द्रविड त्याच्या मार्गदर्शकाच्या भूमिकेबद्दल म्हणाला, “मागील २ वर्षांपासून मी माझ्या कामाची मजा घेतोय आणि या अनुभवातुन मी खूप काही शिकवतोय. मी बराच काळ क्रिकेट खेळत होतो म्हणून मी एक चांगला मार्गदर्शक बनू शकत नाही. खेळणे एक वेगळी गोष्ट आहे आणि संघाला मार्गदर्शन करणे वेगळी गोष्ट आहे.”
“मी मार्गदर्शन करताना जास्त लक्ष याकडे देतो की मी फक्त खेळाडूंना मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करत नाही तर त्यांच्यातल्या माणसांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो. मी १९ वर्षांखालील क्रिकेट खेळण्याच्या प्रवासातून गेलो आहे. त्यामुळे मी समजू शकतो की खेळाडूंना किती ताण असतो. म्हणूनच मी संघाचं वातावरण चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करतो. चांगले वातावरण निर्माण करून खेळाडूंनी त्यांच्यातल्या क्षमतेनुसार चांगला खेळ करावा असा माझा प्रयन्त असतो.”
जेव्हा मी १९ वर्षांखालील संघाचे मार्गदर्शन करायला सुरुवात केली तेव्हा मला एक गोष्ट जाणवली की या संघात खेळाडू बराच काळ खेळतात आणि मला हेच जास्त धोकादायक वाटलं म्हणून आम्ही असा निर्णय घेतला की एक खेळाडू एकच विश्वचषक खेळू शकतो.”
“वॉशिंग्टन सुंदर, झीशान अन्सारी, महिपाल लामरोर या सारख्या खेळाडूंना त्यांच्या राज्याच्या रणजी स्पर्धेसाठी निवडल गेले आहे. अगदी राज्य संघटनाही पुढचा विचार करत आहे आणि खेळाडूंना १९ वर्षांखालील क्रिकेट खेळात राहण्याची सक्ती करत नाहीये.माझ्यामते वयाची मर्यादा असणारे संघ उपाय असू शकतो पण याला मर्यादा आहेत आणि मग मुख्य संघात खेळू शकता.”
द्रविडने रिषभ पंत आणि श्रेयश अय्यरचेही उदाहरण दिले. त्याचबरोबर तो म्हणाला युवा खेळाडूंना अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यांच्या कामगिरीची निवड सामिती दखल घेते तसेच भारतीय अ संघ देखील अनेक सामने खेळतो यात खेळाडूंची कामगिरी उत्तम झाली आहे. तो असेही म्हणाला, कधीकधी राष्ट्रीय संघात स्थान मिळवणे कठीण असते कारण संघात अनेक चांगले खेळाडू आधीपासूनच खेळत असतात.
द्रविडने आयसीसीने बॅटच्या बाबतीत केलेल्या नवीन नियमावर भाष्य करताना म्हणाला “बॅटच्या बाबतीत केलेल्या नियमाचा नक्कीच परिणाम होणार आहे. सामन्याचा निकालच काय परिणाम होतोय ते दाखवेल. पण हा बदल खूप मोठा नाही. फक्त काही खेळाडूच अश्या बॅट वापरत होते ज्या आत्ता नियमात बसत नाही. हा निर्णय चांगला आहे”
त्याचबरोबर फलंदाजीत खेळपट्टीचा स्वभाव आणि बाउंड्रीजच्या लांबीवर पण खूप काही अवलंबून असते” एका इव्हेंटच्या मुलाखतीत द्रविड हे बोलत होता.