क्रिकेटविश्वातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. बिहार राज्यातील गोपाळगंज येथे शुक्रवारी (दि. 27 जानेवारी) क्रिकेट खेळताना जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत एक तरुण मुलगा गंभीररीत्या जखमी झाला. त्यानंतर उपचारादरम्यान त्या मुलाचे निधन झाले. यानंतर परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. तसेच, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने या प्रकरणात 6 व्यक्तींना अटक केली आहे.
विरोध करणाऱ्या नातेवाईकांवर दगडफेक
ही घटना बिहार (Bihar) येथील गोपाळगंज (Gopalganj) जिल्ह्यातील बसडीला गावातील आहे. हाती आलेल्या वृत्तांनुसार, या गावात तीन दिवसांपूर्वीच क्रिकेट खेळण्यावरून वाद झाला होता. त्यावरूनच शुक्रवारी दोन्ही गटात जोरदार हाणामारी झाली. त्यात 20 वर्षीय अंकित कुमार (Ankit Kumar) नावाचा तरुण गंभीररीत्या जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.
कुटुंबीय त्याचे पार्थिव घेऊन शनिवारी (दि. 28 जानेवारी) सकाळपासून आंदोलन करत होते. तेव्हाच दुसऱ्या गटाकडून त्यांच्यावर दगडफेक केली गेली. त्यामुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
पोलिसांकडून तपास सुरू
सूचना मिळाल्यानंतर पोलिसांनी लक्ष घातले. त्यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर एकूण 6 लोकांना अटक केली आहे. तसेच, त्यांची चौकशी केली जात आहे. पोलिसांनी या घटनेतील मुख्य आरोपीचीही ओळख पटवली आहे. त्याला अटक करण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने छापेमारी केली जात आहे. (person died in fighting while playing cricket in bihar gopalganj)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
साऊथ सुपरस्टारलाही आवरला नाही संजूसोबत सेल्फी घेण्याचा मोह, फोटो सर्वत्र व्हायरल
पराभवानंतर टीम इंडियात दुसऱ्या टी20त होणार बदल? वॉशिंग्टन सुंदरने स्पष्टच सांगितले