पुणे | पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित बीव्हीजी इंडिया पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत साखळी फेरीत रोअरिंग लायन्स् संघाने पीसीटीए रेजिंग्ज् बुल्स संघाचा 39-38 असा तर स्पीडिंग चिताज् संघाने पुणे ओपन स्ट्राईकिंग जॅगवार्स संघाचा 48-33 असा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
पीवायसी हिंदू जिमखाना येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत अतितटीच्या झालेल्या लढतीत रोअरिंग लायन्स् संघाने पीसीटीए रेजिंग्ज् बुल्स संघाचा पराभव केला. आर्यन सुतार, जैश्णव शिंदे, आर्या पाटील, रुमा गायकैवारी व अनन्मय उपाध्याय यांच्या विजयी कामगिरीच्या बळावर रोअरिंग लायन्स् संघाने पीसीटीए रेजिंग्ज् बुल्स संघाचा 39-38 असा केवळ एका गुणाने पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
दुस-या लढतीत स्पीडिंग चिताज् संघाने आपल्या विजयी कामगिरीत सातत्य राखत पुणे ओपन स्ट्राईकिंग जॅगवार्स संघाचा 48-33 असा पराभव केला. देवांशी प्रभुदेसाई, सुजय देशमुख, अदिती लाखे, वैष्णवी अडकर, यशराज दळवी यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत करत संघाला विजय मिळवून दिला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
रोअरिंग लायन्स् वि.वि पीसीटीए रेजिंग्ज् बुल्स – 39-38(एकेरी: 10 वर्षाखालील मुली: काव्या देशमुख पराभूत वि प्रिशा शिंदे 1-4, 10वर्षाखालील मुले: अमन शहा पराभुत वि शार्दुल खवळे 3(3)-4, 12वर्षाखालील मुली: श्रावणी देशमुख पराभुत वि कौशिकी समंथा 4-6, 12वर्षाखालील मुले:आर्यन सुतार वि.वि अभिराम निलाखे 6-2, 14वर्षाखालील मुले: सोनल पाटील पराभूत वि समिक्षा श्रॉफ 2-6, 14वर्षाखालील मुले: जैश्णव शिंदे वि.वि शौर्य राडे 6-2, 16वर्षाखालील मुली: आर्या पाटील वि.वि हृदया शहा 6-2, 16वर्षाखालील मुले: सिध्दार्थ जाडली पराभूत वि अर्जुन गोहड 0-6, मिश्र दुहेरी: रुमा गायकैवारी/अनन्मय उपाध्याय वि.वि आर्यन शहा/ हरिता संकरमण 6-0, मिश्र दुहेरी: अथर्व अंमृले/आर्या पाटील पराभूत वि सेश्वर झंझोटे/हृदया शहा 5-6(5))
स्पीडिंग चिताज् वि.वि पुणे ओपन स्ट्राईकिंग जॅगवार्स- 48-33(एकेरी: 10वर्षाखालील मुली: देवांशी प्रभुदेसाई वि.वि धृवी अद्यंथाया 4-2, 10वर्षाखालील मुले: सुजय देशमुख वि.वि विरेन चौधरी 4-2, 12वर्षाखालील मुली: अदिती लाखे वि.वि पुर्वा भुजबळ 6-4, 12वर्षाखालील मुले: पियुष जाधव पराभूत वि अमोद सबनीस 1-6, 14वर्षाखालील मुली: श्रावणी खवले पराभूत वि मधुरीमा सावंत 5-6(10-12), 14वर्षाखालील मुले: सुधांशू सावंत पराभूत वि अनर्घ गांगुली 4-6, 16वर्षाखालील मुली: वैष्णवी अडकर वि.वि मृण्मयी बागवे 6-2, 16वर्षाखालील मुले: यशराज दळवी वि.वि इंद्रजीत बोराडे 6-3, मिश्र दुहेरी- पार्थ देवरूखकर/आशी छाजेड वि.वि अन्या जेकब/सोहम सदावर्ते 6-2, मिश्र दुहेरी- प्रसाद इंगळे/वैष्णवी अडकर वि.वि नमित मिश्रा/मृण्मयी बागवे 6-0)
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
–हजाराव्या कसोटी सामन्यासाठी सर्वकालीन इंग्लंड संघाची निवड, केविन पीटरसनसह हे खेळाडू आहेत संघात
–भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टन्टाईनने मागितली माफी