इंग्लंड आणि भारत यांच्यातील चौथा कसोटी सामना द ओव्हल येथे खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी इंग्लंडचा माजी फलंदाज केविन पीटरसन याने या मैदानाशी संबंधित आपल्या आठवणी सांगितल्या आहेत. पीटरसनने 2007 मध्ये ओव्हल कसोटी दरम्यान भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी याला बाद केले होते आणि आता त्याने या विकेटला सर्वात आवडत्या आठवणींपैकी एक म्हटले आहे.
सध्या सुरू असलेल्या भारत-इंग्लंड मालिकेतील चौथी कसोटी 2 सप्टेंबरपासून द ओव्हल येथे खेळवली जाईल. पाच सामन्यांची मालिका सध्या 1-1 ने बरोबरीत आहे. तत्पूर्वी मंगळवारी (31 ऑगस्ट) केविन पीटरसनने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये धोनी त्याला त्याच्या षटकात सलग दोन षटकार मारतानाचा आणि तिसरा षटकार मारण्याचा प्रयत्न करताना त्याची विकेट गमावताना दिसतो आहे.
धोनीच्या विकेटवर पीटरसनने खुलासा केला आहे की, “ऍलिस्टर कुक एका उंच चेंडूच्या (डीप स्क्वेअर लेगवर) खाली होता आणि अंदाज लावा की हा फलंदाज कोण होता? एम एस धोनी. त्याने मला एक लांब षटकार ठोकला आणि चेंडू जवळजवळ मैदानाबाहेर गेला. मी पुढचा चेंडू थोडा बाहेर टाकला आणि विकेट मिळवली.”
यानंतर शेवटी पीटनसन म्हणाला की, “एमएस, मला हे सांगायला भीती वाटते आहे. पण त्यावेळी तू माझ्या खिशात होतास, मी तुझ्या खिशात नव्हतो.”
या सामन्यात धोनी 92 धावांवर फलंदाजी करत होता. मात्र त्याला कामचलाऊ फिरकीपटू पीटरसनने बाद केले होते. त्या सामन्यात, भारतीय यष्टीरक्षक फलंदाजाने केवळ 81 चेंडूंमध्ये नऊ चौकार आणि चार षटकारांसह एकूण 92 धावा केल्या होत्या.
तत्पूर्वी, हेडिंग्ले येथे खेळल्या गेलेल्या मालिकेच्या तिसऱ्या कसोटीत भारताचा पहिला डाव 78 धावांवर संपुष्टात आला तर इंग्लंडने पहिल्या डावात 432 धावा केल्या आणि 354 धावांची आघाडी घेतली. भारतीय संघाचा दुसरा डाव 278 धावांवरच आटोपला आणि भारतीय संघाला एका डावाच्या पराभवाने सामोरे जावे लागले. यासह इंग्लडने मालिकेतही 1-1 अशी बरोबरी केली आहे. याआधी भारतीय संघांने इंग्लडला लॉर्ड्स कसोटीत पराभूत केले होते. पहिली कसोटी पाऊसामुळे अनिर्णित राहिली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटी मालिकेत भारताची आघाडी पक्की? ‘या’ २ शिलेदारांचे ओव्हलवरील रेकॉर्ड वाचून इंग्लंडला फुटेल घाम
भांडं फुटलं! धोनीचा हुकुमी एक्का ‘या’ कलाकाराच्या बहिणीला करतोय डेट, सर्वत्र रंगली एकच चर्चा
अफगाणिस्तानला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायची आहे कसोटी मालिका, तालिबानी यावेळीही घालणार खोडा?