पुणे:आयएफसीआर रोटरी डिस्ट्रीक्ट 3131 तर्फे आयोजित आयएफसीआर आरपीएल अरबन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथरस् संघाने कोवाई रॉकर्स संघाचा तर रोटरी फायरबुल नागपुर संघाने मिडटाऊन वॉरियर्स सांगली संघाचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
पुना क्लब, पुळशी क्रिकेट मैदानावर झालेल्या सामन्यात साखळी फेरीत फैताज लांडगेच्या अष्टपैलु कामगिरीच्या जोरावर पिंपरी पॅंथरस् संघाने कोवाई रॉकर्स संघाचा 137 धावांनी दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा खेळताना फैताज लांडगेच्या 35, सुनिल रोहेलाच्या 21 व अविनाश बारणेच्या 16 धावांच्या जोरावर पिंपरी पॅंथरस् संघाने 15 षटकात 5 बाद 204 धावांचा डोंगर रचला. 204 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शांत वाघेरेच्या अचूक गोलंदाजीसमोर कोवाई रॉकर्स संघ केवळ 12 षटकात सर्वबाद 67 धावांत गारद झाला. फैताज लांडगे सामनावीर ठरला.
दुस-या लढतीत संदीप शिंदेच्या अष्टपैलु कामगिरीच्या जोरावर रोटरी फायरबुल नागपुर संघाने मिडटाऊन वॉरियर्स सांगली संघाचा 5 गडी राखून पराभव केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
पिंपरी पॅंथरस्- 15 षटकात 5 बाद 204 धावा(फैताज लांडगे 35, सुनिल रोहेला 21, अविनाश बारणे 16, रोहन घाडगे 13, सुमित मंदन 2-36, वसंत कुमार 2-32, आर.वादिवेल 1-31) वि.वि कोवाई रॉकर्स- 12 षटकात सर्वबाद 67 धावा(वसंत कुमार 21, प्रशांत वाघेरे 3-3, सुनिल मंदन 1-18, शेखर दालमिया 1-7, विजय नवले 1-0) सामनावीर- फैताज लांडगे
पिंपरी पॅंथरस् संघाने 137 धावांनी सामना जिंकला
मिडटाऊन वॉरियर्स सांगली- 15 षटकात 7 बाद 74 धावा(संतोष साखरे 23, जयदिप पाठक 13, समिर सहस्त्रबुध्ये 3-8, सारंग देगवारकर 2-6, दिलिप फोंडे 1-19, संदिप शिंदे 1-6) पराभूत वि रोटरी फायरबुल नागपुर- 9 षटकात 5 बाद 76 धावा(संदीप शिंदे 33, तुषार देशपांडे 10, संतोष साखरे 3-11, राजेश अंबेकर 1-13) सामनावीर- संदीप शिंदे
रोटरी फायरबुल नागपुर संघाने 5 गडी राखून सामना जिंकला.