---Advertisement---

“प्रत्येक संघाला त्यांची भीती वाटली पाहिजे” मुंबईच्या विजयानंतर माजी खेळाडूची मोठी प्रतिक्रिया

On: सोमवार, एप्रिल 28, 2025 3:40 PM
---Advertisement---

सध्या आयपीएलचा 18वा हंगाम सुरू आहे. यंदाच्या आयपीएल हंगामाच्या सुरूवातीला चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्सची कामगिरी खास राहिली नव्हती. संघाने पहिल्या 5 सामन्यात केवळ 1 विजय मिळवला होता. पण, यानंतर संघाने जबरदस्त पुनरागमन केले आहे आणि प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी तो एक मजबूत दावेदार असल्याचे दिसून येत आहे. मुंबई इंडियन्सची सातत्यपूर्ण कामगिरी पाहून त्यांचा माजी फिरकी गोलंदाज पीयूष चावलाने (Piyush Chawla) मोठी प्रतिक्रिया दिली आहे. चावलाच्या मते, आता प्रत्येक संघाला मुंबई इंडियन्सची भीती वाटली पाहिजे कारण या संघात नंबर 1 ते 11 पर्यंतचे मॅचविनर खेळाडू आहेत.

मुंबई इंडियन्सने या हंगामात आतापर्यंत 10 सामने खेळले आहेत, त्यापैकी त्यांनी 6 सामने जिंकले आहेत आणि 4 सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. सुरुवातीला मुंबई इंडियन्सला अनेक सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता परंतु आता त्यांनी सलग 5 सामने जिंकले आहेत. यामुळे, संघाचे 12 गुण झाले आहेत. मुंबई सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे.

पीयूष चावलाच्या मते, मुंबई इंडियन्स संघात अनेक मॅचविनर खेळाडू आहेत आणि त्यामुळे हा संघ खूप धोकादायक बनतो. जिओ हॉटस्टारवरील संभाषणादरम्यान पीयूष चावला म्हणाला, “तुम्ही पाहिले तर, मुंबई इंडियन्स संघात अनेक मॅचविनर आहेत. नंबर 1 ते 11 पर्यंत, त्यांच्या संघात मॅचविनर खेळाडू आहेत. रायन रिकेलटनने आज एक उत्तम खेळी खेळली. रोहित शर्माबद्दल आपल्याला सर्वांना माहिती आहे, त्याने गेल्या 2 सामन्यांमध्ये काय केले. जसप्रीत बुमराहने शानदार गोलंदाजी केली आणि आज विल जॅक्सने त्या 2 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. मुंबईसाठी परिस्थिती योग्य चालली आहे. हार्दिक पांड्या जे काही करत आहे, त्याचा संघाला फायदा होत आहे. या प्लेइंग इलेव्हनमध्ये अनेक मॅचविनर आहेत. जेव्हा मुंबई इंडियन्स संघ असे खेळतो, तेव्हा प्रत्येक संघाला त्यांची भीती वाटली पाहिजे.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---