---Advertisement---

…अन् पियुष चावलाने घेतलेल्या त्या विकेटचा एका वर्षात सचिनने घेतला बदला

On: गुरूवार, डिसेंबर 24, 2020 10:27 PM
---Advertisement---

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला बाद करणे हे कोणत्याही गोलंदाजासाठी स्वप्नासारखेच आहे. सचिनच्या विरुद्ध शेन वॉर्न, शोएब अख्तर, ग्लेम मॅकग्रा, ब्रेट ली, यांसारखे दिग्गज गोलंदाजही अनेकदा अपयशी ठरले आहेत. पण 2005 ला झालेल्या चॅलेंजर्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात 16 वर्षीय पियुष चावलाने न घाबरता सचिनला बाद केले होते.

त्यावेळी भारत ब संघाचा भारतीय वरिष्ठ संघाविरुद्ध (India Seniors team) चॅलेंजर्स ट्रॉफीमध्ये अंतिम सामना मोहाली येथे होत होता. भारतीय वरिष्ठ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता.

यावेळी दिनेश मुंगीया कर्णधार असलेला भारत ब संघ 177 धावांवर सर्वबाद झाला होता. त्यानंतर धावांचा पाठलाग करण्यासाठी भारतीय वरिष्ठ संघाकडून उतरलेल्या सचिनला 7 व्या षटकात चावलाने गुगली टाकत 22 धावांवर त्रिफळाचीत केले होते. त्याने घेतलेली ही विकेट प्रसिद्ध आहे. सचिनच्या या विकेटमुळे चावला प्रकाशझोतात आला होता.

विशेष म्हणजे त्यानंतर 1 वर्षाने चॅलेंजर्स ट्रॉफीमध्ये पुन्हा सचिन आणि चावला आमने-सामने आले तेव्हा सचिनने इंडिया ब्यू कडून तर चावला इंडिया ग्रीन संघाकडून चेन्नईमध्ये खेळत होता. या सामन्यात चावलाच्या पहिल्यात षटकात सचिनने 20 धावा काढल्या होत्या. यामध्ये सचिनने सलग 4 चेंडू सीमापार केले होते. त्याने सलग 4 चेंडूवर 6,4,4,6 अशा धावा फटकावल्या होत्या.

या घटनेची आठवण अरुण वेणूगोपाल यांच्या युट्यूब चॅनेलवर बोलताना चावलाने सांगितली आहे. तो म्हणाला, ‘पार्थिव पटेल या विकेटच्या मागे होते. दिनेश मोंगिया कर्णधार होता. जेव्हा आपण 15-16 वर्षांचे असता आणि सचिन तेंडुलकरला गोलंदाजी करत असता तेव्हा एकतर तुम्ही चिंताग्रस्त असता किंवा रिलॅक्स असता. सुदैवाने सचिन तेंडुलकरला गोलंदाजी करताना मी रिलॅक्स होतो.’

‘जरी सचिन पाजीने माझे चेंडूवर मोठे फटके मारले असते, तरी काही फरक पडला असता का? जर सचिन पाजी शेन वॉर्न, मुथय्या मुरलीधरन आणि ग्लेन मॅकग्रा सारख्या गोलंदाजांना फटकावतो तर त्याने माझ्या गोलंदाजीवर मोठे फटके मारणे ही मोठी गोष्ट नव्हती. त्यामुळे त्यावेळी माझ्याकडे हरण्यासारखे काही नव्हते. मी फक्त सचिन पाजीला गोलंदाजी करण्याच्या क्षणाचा आनंद घेत होतो.’

चावला पुढे म्हणाला, ‘जेव्हा रन-अप घेतो तेव्हा एक गोलंदाज म्हणून आपल्याला खरोखर काय गोलंदाजी करायची आहे याचा विचार करावा लागतो. अशा परिस्थितीत नेमके काय घडले हे मला ठाऊक नाही. जेव्हा मी माझ्या रन-अपला सुरुवात केली तेव्हा मला वाटले की मी लेग स्टंपपासून लेगस्पिन गोलंदाजी करेन ज्यामुळे चेंडू त्याच्यापासून दूर जाईल. पण प्रामाणिकपणे मला अजूनही माहित नाही. आता जवळजवळ 16 वर्षे झाली आहेत. माझ्या मनात काय आले हे मला माहित नाही.’

तसेच 1 वर्षाने सचिनने चावला विरुद्ध एकाच षटकात फटकावलेल्या 20 धावांबद्दल चावला म्हणाला, ‘लोकांना वाटले की मी मागील वेळेप्रमाणे सचिन पाजीची विकेट घेईन. पण सचिन पाजी गोष्टी पटकन विसरणारी व्यक्ती नाही. पुढच्याच वर्षी चेन्नईमधील झालेल्या सामन्यात पाजीने माझ्या पहिल्या षटकात सुमारे 20 धावा फटकावल्या. हेच मी म्हणत होतो की जर पाजीनी माझ्या गोलंदाजीवर मोठे फटके मारले तरी ही मोठी गोष्ट नाही. पाजींनी बर्‍याच गोलंदाजांना फटकावले आहे.’

चावलाने त्यानंतर २००६ मध्ये भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

ट्रेंडिंग लेख –

गुडबाय २०२०: या’ पाच क्रीडासुंदरींनी घेतली यावर्षी निवृत्ती; एक होती जगातील सर्वात सुंदर क्रीडापटू

स्लेजिंग करणार्‍यांना प्रत्युत्तर देताना भारतीय खेळाडूंनी केलेल्या ३ जबरदस्त खेळ्या

‘बॉक्सिंग डे कसोटी’ म्हणजे नक्की आहे तरी काय? जाणून घ्या सविस्तर

महत्त्वाच्या बातम्या –

अरेरे! पुढील ६ महिन्यांसाठी टीम इंडियाचा धडाकेबाज गोलंदाज संघातून बाहेर

‘कृपा कर आणि आता पाकिस्तानच्या प्रशिक्षकपदाचाही राजीनामा दे’, चाहत्यांची जोरदार मागणी

मोठी बातमी! विश्वचषकात पहिली हॅट्रिक घेणारा क्रिकेटपटू बनला भारतीय निवड समीतीचा प्रमुख

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---