---Advertisement---

गतविजेत्या बंगालची युपीसमोर शरणागती!

On: शुक्रवार, जानेवारी 21, 2022 9:40 PM
---Advertisement---

प्रो कबड्डी लीग २०२१-२०२२ च्या ६९ व्या सामन्यात गतविजेत्या बंगाल वॉरियर्सचा सामना युपी योद्धा संघाशी झाला. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात अखेरच्या क्षणी युपी योद्धाने ४०-३६ असा विजय नोंदविला.

मनिंदर सिंग विरुद्ध परदीप नरवाल अशा दिग्गज रेडरमधील या सामन्यात पहिल्या हाफमध्ये हे दोघे शांत राहिले. दोघांनी अनुक्रमे ६ व ५ गुण मिळवले. बंगालसाठी सुकेश हेगडेने पहिल्या हाफमध्ये ६ गुण कमावले होते. पहिल्या हाफच्या अखेरीस युपी १९-१८ असा आघाडीवर होता.

दुसऱ्या हाफमध्ये परदीप व मनिंदर यांनी आपापल्या संघाची जबाबदारी खांद्यावर घेत गुण मिळविण्यास सुरुवात केली. दोन्ही संघ अत्यंत संघर्षात्मक खेळ करत असताना युपीने सामना संपण्यास दहा मिनिटे शिल्लक असताना बंगालला ऑल आउट करत पाच गुणांची मोठी आघाडी मिळवली. त्यानंतर, मनिंदरने एकेरी दुहेरी गुण घेत पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, अखेरच्या दीड मिनिटात मनिंदर सुपर टॅकल झाल्याने बंगालच्या आशा संपुष्टात आल्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---