काल प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमातील नागपूर मुक्कामातील शेवटचा सामना बेंगलुरु बुल्स आणि तामिल थालयइवाज यांच्यात झाला. सामना जिंकून तामिल थालयइवाज यांनी प्रो कबड्डीमध्ये आपला पहिला विजय मिळवला. आता प्रो कबड्डीचा पुढचा मुक्काम असणार आहे गुजरातमधील अहमदाबाद शहरात.
अहमदाबादमधील पहिला सामना होणार आहे गुजरात फार्च्युनजायंट्स आणि यू मुंबा या दोन संघांमध्ये. यू मुंबाने मागील सामन्यात दबंग दिल्लीवर ३६-२२ अशी मात केली होती तर गुजरात फार्च्युनजायंट्सला त्याच्या मागील सामन्यात हरियाणा स्टीलर्सकडून मोठी हार पत्करावी लागली होती.
यू मुंबाचा कर्णधार अनुप कुमार हा आतापर्यंतच्या सामन्यात फक्त रेडर म्हणून नाही तर डिफेंडर म्हणून ही खेळत आहे. त्याने आतापर्यंतच्या ३ सामन्यात २१ गुण मिळवले आहेत ज्यात १७ रेड तर ४ डिफेन्ससाठीचे गुण आहेत. त्याची रेडींगमध्ये साथ देण्यासाठी शाबीर बापू, काशीलिंग आडके आणि नितीन मदने देखील आहेत.
तर दुसऱ्या बाजूला बघता गुजरात फार्च्युनजायंट्सच्या संघाने या मोसमात सर्व काही बघितले आहे. ३ सामन्यांमध्ये त्यानी एक सामना जिंकला आहे तर सामना हरला आहे. त्यांचा एक सामना टाय ही झाला आहे. महेंद्र राजपूत आणि राकेश नरवाल यांनी जरी चांगली खेळी केली असली तरी संघाला डिफेन्समध्ये फझल तर रेडींगमध्ये सुकेश हेगडेकडून अपॆक्षा असेल.
संभाव्य संघ
गुजरात फार्च्युनजायंट्स
१. सुकेश हेगडे
२. फेजेल अत्र्राचली
३. महेंद्र राजपूत
४.राकेश नरवाल
५. सुनील कुमार
६. अबोझार मिघानी
७. पारवेश भसीसवाल
यु मुंबा
१. अनुप कुमार
२. शब्बीर बापू
३. काशीलिंग आडके
४. डी. सुरेश
५. कुलदीप सिंग
६. हादी ओश्तोराक
७. जोगिंदर नरवाल