---Advertisement---

आयपीएलला नावं ठेवणाऱ्यांनो; IPLमधून देशाला काय मिळतं? बातमी वाचा समजेल

On: मंगळवार, मार्च 29, 2022 2:05 PM
Ayush-Badoni-Tilak-Varma
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग या टी२० लीगने भारतीय क्रिकेटला अनेक हिरे शोधून दिले आहेत. या लीगमध्ये जगभरातील एकाहून एक मातब्बर खेळाडू सहभाग घेतात, यामध्ये भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळणाऱ्या परंतु देशांतर्गत स्तरावर आपली चमक दाखवणाऱ्या (अनकॅप्ड) क्रिकेटर्सचाही समावेश असतो. हे युवा भारतीय शिलेदार आयपीएलमध्ये आपल्या प्रदर्शनाचा ठसा उमटवतात आणि राष्ट्रीय संघाच्या निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतात. अष्टपैलू हार्दिक पंड्या, हा आयपीएलने भारतीय संघाला दिलेला हिरा आहे. 

सध्या भारतातील मुंबई, पुण्याच्या स्टेडियमवर आयपीएल २०२२ चे (IPL 2022) सामने खेळवले जात आहेत. यातील सुरुवातीच्या सामन्यांमध्ये भारताचे अनकॅप्ड क्रिकेटपटू चमकले (Indian Domestic Players) आहेत. तिलक वर्मा (Tilak Varma), ललित यादव (Lalit Yadav), आयुष बदोनी (Ayush Badoni), अभिवन मनोहर (Abhinav Manohar) या देशांतर्गत क्रिकेट गाजवणाऱ्या शिलेदारांनी आपल्या आयपीएल फ्रँचायझींना सामना जिंकून देण्यात बहुमूल्य योगदान दिले आहे. 

तिलक वर्मा-
तिलक वर्मा यंदा ५ वेळच्या आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. १९ वर्षीय वर्माने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आयपीएल पदार्पण करताना (IPL Debut Against DC) छोटेखानी पण शानदार खेळी केली आहे. मुंबईचा संघ २ बाद ८३ धावा अशा स्थितीत असताना चौथ्या क्रमांकावर हा डावखुरा युवा फलंदाज फलंदाजीसाठी आला होता. त्याने त्याने कुलदिप यादव, ललित यादव, खलील अहमद यांसारख्या अनुभवी गोलंदाजांचा सामना करताना चक्क १४६.६७ च्या स्ट्राईक रेटने धावा कुटल्या. त्याने १५ चेंडू खेळताना ३ खणखणीत चौकारांच्या मदतीने २२ धावा फटकावल्या.

ललित यादव-
ललित यादव, हा २५ वर्षीय अष्टपैलू अद्याप भारतीय संघात पदार्पण करू शकलेला नाही. मात्र तो गेल्या गतवर्षीपासून दिल्ली कॅपिटल्स संघाकडून जबरदस्त कामगिरी करत भारतीय संघाचे दार ठोठावतो आहे. आयपीएल २०२२ मधील दिल्ली संघाच्या मुंबई इंडियन्सविरुद्ध जालेल्या पहिल्याच सामन्यात त्याने संघाला ४ विकेट्सने विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला.

गोलंदाजीत विशेष प्रदर्शन न करू शकल्यानंतर त्याने संघासाठी फिनिशरची भूमिका बजावली. संघाची सलामी आणि कर्णधार रिषभ पंत लवकरच पव्हेलियनला परतल्यानंतर त्याने डावाखेर नाबाद राहात ३८ चेंडूंमध्ये २ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने ४८ धावा चोपल्या आणि १० चेंडू शिल्लक असतानाच संघाला सामना जिंकून दिला.

आयुष बदोनी-
कालपर्यंत (२८ मार्च) आयुष बदोनी हे नाव कोणालाही परिचित नव्हते. लखनऊ सुपर जायंट्सकडून पहिल्यांदाच आयपीएलच्या रणांगणात उतरलेल्या या शिलेदाराने पदार्पणाच्या सामन्यात सर्वांना आपली दखल घेण्यास भाग पाडले. एकीकडे लखनऊचे फलंदाज सपशेल फेल ठरत असताना गुजरात टायटन्सविरुद्ध त्याने प्रशंसनीय खेळी केली. ४१ चेंडूंमध्ये १३१ च्या स्ट्राईक रेटने त्याने ५४ धावा कुटल्या. यात त्याच्या ३ षटकार आणि ४ चौकारांचा समावेश होता.

अभिनव मनोहर-
आयुष बदोनीप्रमाणेच अनेकांना माहित नसलेल्या अभिनव मनोहरने गुजरात टायटन्सकडून आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केली आहे. लखनऊविरुद्ध पदार्पणाचा आयपीएल सामना खेळताना त्याने सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत केवळ ७ चेंडूत नाबाद १५ धावा चोपल्या. या खेळीदरम्यान त्याने ३ चौकारही मारले. या छोटेखानी खेळीसह त्याने संघाला सामनाही जिंकून दिला.

महत्त्वाच्या बातम्या-

कृणालने बाद केल्यानंतर काय वाटले? हार्दिक म्हणतो, ‘जर आम्ही पराभूत झालो असतो तर…’

IPL2022| हैदराबाद वि. राजस्थान सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!

आजचा सामना: केव्हा आणि कसा पाहाल हैदराबाद वि. राजस्थान सामना, कसे असेल हवामान; जाणून घ्या सर्वकाही

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---