मँचेस्टर। आज(9 जूलै) 2019 विश्वचषकात भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात पहिला उपांत्य सामना ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर सुरु आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र पावसाचा व्यत्यय आल्याने हा सामना 46.1 षटकात 5 बाद 211 धावांवर थांबला आहे.
तसेच आज पाऊसाचा व्यत्यय कायम असल्याने सामन्यातील आजचा खेळ थांबवण्यात आला आहे. त्यामुळे या सामन्यासाठी उद्या(10 जूलै) राखीव दिवस असल्याने उर्वरित सामना उद्या भारतीय प्रमाणवेळे नुसार दुपारी 3 वाजता सुरु होईल.
उद्या सामना जिथे थांबला त्या धावसंख्येवरुनच सुरु होईल. त्यामुळे न्यूझीलंडला त्यांच्या डावातील उर्वरित 3.5 षटके फलंदाजी करण्यासाठी उद्या मैदानात उतरावे लागणार आहे. त्यानंतर भारतीय संघ फलंदाजी करेल.
या सामन्यात न्यूझीलंडकडून कर्णधार केन विलियम्सनने 95 चेंडूत 67 धावा केल्या आहेत. तसेच रॉस टेलरने नाबाद 67 धावा केल्या आहेत. पावसाचा व्यत्यय आला त्यावेळी टेलरबरोबर टॉम लॅथम 3 धावांवर नाबाद खेळत होता.
या व्यतिरिक्त मात्र न्यूझीलंडच्या अन्य फलंदाजांपैकी मार्टिन गप्टिल(1), हेन्री निकोल्स(28), जेम्स निशाम(12) आणि कॉलिन डी ग्रँडहोमने(16) स्वस्तात विकेट गमावल्या.
भारताकडून भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा आणि युजवेंद्र चहलने प्रत्येकी 1 विकेट घेतली आहे.
हा सामना कोणत्याही व्यत्ययामुळे उद्याही पूर्ण झाला नाही तर भारतीय संघ साखळी फेरीनंतर गुणतालिकेत न्यूझीलंडपेक्षा वरच्या स्थानावर असल्याने थेट अंतिम सामन्यासाठी पात्र ठरेल.
With the rain unrelenting, play has been called off for the day. New Zealand will resume their innings tomorrow at 10.30am on 211/5 with 3.5 overs to bat.
Here's hoping for better weather tomorrow 🤞#INDvNZ | #CWC19 pic.twitter.com/p9KdXPdd0g
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) July 9, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–भारताविरुद्ध अर्धशतकी खेळीबरोबरच कर्णधार विलियम्सनने केली एका विश्वविक्रमाची बरोबरी