Monday, March 27, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसह खास पुरस्कारांवर भारतीयांचेच नाव; विराट सामनावीर, तर ‘हे’ दोघे बनले मालिकावीर

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसह खास पुरस्कारांवर भारतीयांचेच नाव; विराट सामनावीर, तर 'हे' दोघे बनले मालिकावीर

March 13, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Virat-Kohli

Photo Courtesy: bcci.tv


बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023च्या 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेसह 3 सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ भारतात आला आहे. यातील कसोटी मालिकेचा शेवट सोमवारी (दि. 13 मार्च) झाला. अहमदाबाद येथे पार पडलेला चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिला. यासह भारताने मालिका 2-1ने जिंकली. विशेष म्हणजे, मागील चार मालिकांमधील हा भारताचा सलग चौथा विजय होता. अशात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत दोन्ही संघांचे खेळाडू चमकले. मात्र, दोन्ही महत्त्वाच्या पुरस्कारांवर भारतीय खेळाडूंनीच नाव कोरले. या लेखातून आपण पुरस्कार विजेत्या भारतीय खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत.

विराट कोहली सामनावीर
चौथ्या कसोटी सामन्यानंतर सामनावीर पुरस्कार विजेत्या खेळाडूच्या नावाची घोषणा झाली. हा पुरस्कार भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याला देऊन त्याचा सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार देण्यामागील कारण म्हणजे, विराटने शेवटच्या सामन्यात केलेली वादळी खेळी. त्याने ऑस्ट्रेलियाच्या 480 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 364 चेंडूंचा सामना केला. या चेंडूंचा सामना करताना त्याने सर्वाधिक 186 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने एकाही षटकाराची मदत घेतली नाही. त्याने यावेळी 15 चौकारांची बरसात केली. विराटचा कसोटीतील हा 10वा सामनावीर पुरस्कार होता.

For his calm, composed and patient century in the final Test, Virat Kohli – our Player of the Match 🔝#TeamIndia | #INDvAUS pic.twitter.com/tfFftZ8HO5

— BCCI (@BCCI) March 13, 2023

विशेष म्हणजे, संपूर्ण मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विराट दुसऱ्या स्थानी आहे. त्याने 4 सामन्यातील 6 डावात फलंदाजी करताना त्याने 49.50च्या सरासरीने 297 धावा केल्या आहेत. विराटने केलेली 186 धावांची खेळी ही मालिकेतील सर्वोच्च धावसंख्या आहे. तसेच, 333 धावांसह उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) सर्वाधिक धावांच्या यादीत अव्वलस्थानी आहे.

मालिकावीर पुरस्कार ‘या’ दोन भारतीयांकडे
चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी केला. अश्विनने या संपूर्ण मालिकेत 17.28च्या सरासरीने आणि 2.59च्या इकॉनॉमी रेटने 25 विकेट्स घेतल्या. तसेच, जडेजाने 18.86च्या सरासरीने आणि 2.57च्या इकॉनॉमी रेटने 22 विकेट्स घेतल्या. सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पहिले दोन स्थान या दोघांनीच काबीज केले. त्यामुळे आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांना मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

Together this pair has troubled some of the best batting line-ups 🤜🏼🤛🏼🔝

They were lethal here in the Border-Gavaskar Trophy as well 👍

A well deserved Joint Player of the series award for these two gentlemen 👏👏#TeamIndia | #INDvAUS pic.twitter.com/bAkLpOY3zi

— BCCI (@BCCI) March 13, 2023

विशेष म्हणजे, अश्विनने मालिकेच्या शेवटच्या सामन्यातील दोन्ही डावात मिळून 7 विकेट्स घेण्याचा पराक्रम गाजवला होता, तर जडेजाला फक्त एकच विकेट घेता आली होती. (Player of the match and players of the series award goes to this indian players)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आख्ख्या BGT मालिकेत चमकले फक्त 4 स्पिनर, पहिला नंबर गाजवला ‘या’ भारतीयाने
नाद करा, पण टीम इंडियाचा कुठं! मागील चारही BGT मालिकेवर भारताने कोरलंय आपलं नाव, पाहा निकाल


Next Post
Rohit Sharma

'माझ्यासाठी वैयक्तिक विक्रम महत्वाचे नाहीत', मालिका विजयानंतर कर्णधार रोहितचे मन जिंकणारे विधान

Rohit-Sharma-And-Virat-Kohli

ही दोस्ती तुटायची नाय! BGT मालिका विजयानंतर रोहितकडून विराटचे कौतुक; म्हणाला, 'आम्ही त्याच्यामुळेच...'

R-Ashwin-And-Ravindra-Jadeja

'आम्ही एकमेकांशिवाय अपूर्ण...', मालिकावीर अश्विन-जड्डूने गायले एकमेकांचे गुणगान, तुम्हीही कराल कौतुक

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143