अमेरिकेमध्ये सध्या मेजर लीग क्रिकेट (MLC) स्पर्धेच्या तिसऱ्या हंगामाला सुरुवात झालेली आहे. स्पर्धेतील दुसरा सामना कैलिफोर्नियाच्या ऑकलैंड कोलिजीयममध्ये एम आय न्यूयॉर्क आणि टेक्सास सुपर किंग्स संघामध्ये खेळला गेला. या सामन्यात टेक्सास संघासाठी खेळत असलेल्या फाफ डुप्लेसिसने शानदार झेल पकडला. 40 वर्षाच्या फाफ डुप्लेसिसने शानदार फिटनेस मेन्टेन केल्याचं त्यावेळी दिसून आलं. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे.
41 YEAR OLD FAF DU PLESSIS FLYING AND TAKING STUNNERS. ???? pic.twitter.com/mBeWeAe2Mr
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 14, 2025
फाफ डुप्लेसिसने हा झेल मुंबई न्यूयॉर्कच्या चौदाव्या षटकात पकडला होता. या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मायकल ब्रेसवेलने एक शानदार शॉट लावला, पण हवेतील हा झेल फाफ डुप्लेसिसने पकडला. त्याचा हा शॉट बघून मायकल सुद्धा आश्चर्यचकित झाला.
फलंदाजीमध्ये डुप्लेसी काही खास कामगिरी करू शकला नाही, त्याने फक्त 18 धावा केल्या. परंतु त्याने जो झेल पकडला त्याने संघाच्या विजयासाठी खूप मदत केली.
MI न्यू यॉर्क आणि टेक्सास सुपर किंग्स सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, सुपर किंग्सने Mi न्यूयॉर्क संघाला तीन धावांनी पराभूत केले.
धावांचा पाठलाग करताना एमआय न्यूयॉर्कने सुद्धा शानदार खेळी केली, एकावेळी त्यांचा विजय निश्चित मानला जात होता, पण त्यांना शेवटच्या षटकात त्यांना पराभव पत्करावा लागला.






