क्रिकेटमध्ये बऱ्याच खेळाडूंचे फलंदाजी क्रमवारीतील स्थान निश्चित असते. त्यांना त्यांच्या आवडीच्या स्थानावर फलंदाजी करायला आवडते. जसे की, सचिन तेंडुलकर कसोटीत चौथ्या स्थानावर फांदाजीस येताना दिसला किंवा ऑस्ट्रेलियाचा पॉन्टिंग तिसर्या क्रमांकावर फलंदाजीला येताना दिसला. सध्याच्या क्रिकेट मध्ये विराट कोहली क्रमांक ३ वर खेळताना दिसतो. परंतु असे काही खेळाडू आहेत, ज्यांनी सलामीपासून (१ किंवा २ क्रमांकाचा फलंदाज) ते ११ व्या क्रमांकापर्यंत फलंदाजी केली आहे. किंवा कमीत कमी १० स्थानांवर तरी फलंदाजी केली आहे. या लेखातही आपण अशा ३ खेळाडूंबद्दल जाणून घेऊ ज्यांनी कमीत कमी १० स्थांनांवर फलंदाजी केली आहे.
१. शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi)
शाहिद आफ्रिदी हा पाकिस्तानचा आक्रमक फलंदाज होता. त्याने २७ कसोटी, ३९८ वनडे आणि ९९ टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जबरदस्त अष्टपैलू कामगिरी केली. त्याच्या संपूर्ण कारकीर्दीत त्याने १० वेगवेगळ्या स्थानांवर फलंदाजी केली आहे. सलामीवीर म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या या खेळाडूने ११ वा क्रमांक सोडला तर सर्व क्रमांकावर फलंदाजी केली आहे. आफ्रिदीने १९९६ मध्ये केनिया विरुद्ध वनडेतून क्रिकेटमध्ये पदार्पण केले, तर फेब्रुवारी २०१७ मध्ये त्याने क्रिकेटमधून निवृत्ती स्वकारली.
२.अब्दुल रझाक (Abdul Razzaq)
अब्दुल रझाक हा पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू होता. पाकिस्तानच्या या अष्टपैलू खेळाडूने आपल्या कारकीर्दीत सामन्यातील पहिल्याच चेंडूचा सामना कधी केला नाही. म्हणजेच त्याने पहिल्या क्रमांकावर कधी फलंदाजी केली नाही, परंतु त्याने बाकी सर्व क्रमांकावर फलंदाजी केली आहे. त्याने ४६ कसोटी सामने, २६५ वनडे तर ३२ कसोटी सामने खेळले आहेत. त्याने १९९६ मध्ये वनडेतून क्रिकेटमध्ये पदार्पण केले, तर २०१३ मध्ये त्याने शेवटचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळाला.
३. लान्स क्लूसनर (Lance Klusener)
लान्स क्लूसनरने आफ्रिकेसाठी १७१ वनडे सामने तर ४९ कसोटी सामने खेळले आहेत. या अष्टपैलू खेळाडूने ११ व्या स्थानाव्यतिरिक्त सर्व स्थानांवर फलंदाजी केली आहे. त्याने १९९६ ला क्रिकेटमध्ये पदार्पण केले तर २००४ मध्ये तो निवृत्त झाला.
(तसेच कसोटी क्रिकेटमध्ये १ ते ११ या स्थानावर केवळ तीन खेळाडूंनी फलंदाजी केली आहे. यात ऑस्ट्रेलियाचे एडवर्ड ग्रेगरी, इंग्लंडचे विल्फ्रेड रोड्स आणि भारताचे अष्टपैलू खेळाडू वीनु मांकड यांचा समावेश आहे.)