---Advertisement---

IND vs ENG: ‘खेळाडू म्हणजे रोबोट नाहीत’ मोहम्मद सिराजला शिक्षा मिळाल्यानंतर इंग्लंडच्या माजी खेळाडूचा संताप

On: सोमवार, जुलै 14, 2025 7:49 PM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) संघात 10 जुलैपासून लॉर्ड्सच्या मैदानावर तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohmmed Siraj) उत्तम गोलंदाजी करत इंग्लंडचा सलामी फलंदाज बेन डकेटला (Ben Duckket) बाद केले. त्यानंतर सिराजने डकेटसमोर जाऊन आक्रमक पद्धतीने सेलिब्रेशन केले. या प्रकरणावर आता आयसीसी (ICC) ने कारवाई करत सिराजला शिक्षा सुनावली आहे.

पण सिराजला ही शिक्षा मिळणे इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) याला अजिबात आवडले नाही. त्याने ICC वर जोरदार टीका केली आहे.

आयसीसी (ICC) कडून शिक्षा मिळाल्यानंतर स्टुअर्ट ब्रॉडने सिराजचं समर्थन करत ICC वर सडकून टीका केली. त्याने सोशल मीडियावर लिहिलं की, हे अगदी हास्यास्पद आहे. सिराजला आक्रमक सेलिब्रेशन केल्याबद्दल 15 टक्के दंड झाला. गिल थेट टीव्हीवर शिव्या देतो, मग त्याचं काय? दोघांनाही शिक्षा द्या किंवा दोघांनाही माफ करा. खेळाडू रोबोट नाहीत आणि त्यांना रोबोट व्हायला नको, पण निर्णयांमध्ये सातत्य असलं पाहिजे.

ICC ने एका निवेदनात म्हटलं की, लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध भारताच्या कसोटी सामन्यात आचारसंहितेचं उल्लंघन केल्यामुळे मोहम्मद सिराजवर सामन्यातील मानधनाच्या 15 टक्के दंड ठोठावला आहे. डकेट बाद झाल्यानंतर सिराजने फॉलो-थ्रूमध्ये जाऊन फलंदाजाच्या अगदी जवळ जाऊन सेलिब्रेशन केलं आणि जेव्हा डकेट लॉन्ग रूमकडे परत जात होता तेव्हा त्याने चेंडूला स्पर्श केला.

तसेच, डकेटला जसप्रीत बुमराहच्या हातून झेलबाद केलं होतं. त्यानंतर सिराज डकेटजवळ जाऊन मोठ्याने ओरडायला लागला. दोघांचे खांदे एकमेकांना घासले देखील होते. सिराज डकेटला रोखून पाहत आक्रमकपणे ओरडताना दिसत होता. यामुळेच ICC ने त्याच्यावर कठोर कारवाई केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---