भारतामध्ये हिवाळा ऋतू सुरु झाला आहेे. त्यामुळे थंडीचे प्रमाणही वाढले आहे. देशात बऱ्याच ठिकाणी थंडी आणि धुक्यमुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचा परिणाम आता क्रिकेट मैदानात दिसत आहे. भारताची राजधनी असलेल्या दिल्लीमध्ये कडाक्याची थंडी बघायला मिळत आहे. अशा परिस्थितीत अरुण जेटली स्टेडियम येथे रणजी ट्रॉफीचा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात खेळाडूंना प्रचंड थंडीचा सामना करावा लागतोय.
मंगळवारी (दि. 27 डिसेंबर) दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियम येथे दिल्ली आणि तामिळनाडू या संघात सामन्याची सुरुवात झाली. या सामन्यात तामिळनाडू संघाचा गोलंदाज लक्ष्मीनारायण विग्नेश हा कानटोपी घालून गोलंंदाजी करताना दिसला. त्याचबरोबर संघाच्या अनेक खेळाडूंनी देखील थंडीपासून वाचण्यासाठी कानटोपी घातली. या खेळाडूंचे कानटोपी घालून खेळतानाचेे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. रणजी ट्रॉफीमध्ये दिल्ली संघाचे प्रदर्शन निराशाजनक आहे. संघाला पहिल्या सामन्यात महाराष्ट्राच्या हातून पराभवाचा सामना करावा लागला होता. तसेच असम संघासोबत खेळलेला दुसरा सामना अनिर्णित राहिला. दिल्ली संघ आपल्या गटात दुसऱ्या स्थानावर आहे.
दिल्ली आणि तामिळनाडू या संघात खेळवल्या जात असलेल्या सामन्यात तामिळनाडूने नाणेफेक जिंकून क्षेत्ररणाचा निर्णय घेतला. दिल्ली संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले. पहिल्या डावात दिल्लीची सुरुवात खराब झाली. सलामीवीर अनुज रावत (Anuj Rawat) आणि कर्णधार यश धुल (Yash Dhull) झटपट बाद झाले. रावत 3 धावांवर बाद झाला तसेच धूलला भोपळाही फोडता आला नाही. सलामीवीर ध्रुव शोरी (Dhruv Shorey) आणि जाँटी सिद्धू (Jonty Sidhu) यांनी डाव सांभाळला. शोरी याने 66 धावा केल्या, तर जाँटीने 57 धावा केल्या. पहिल्या दिवशी 66 षटकांअखेर दिल्लीची धावसंख्या 187/5 अशी होती. तामिळनाडू संघासाठी लक्ष्मीनारायण विग्नेश (L. Vignesh) याने 3 विकेट घेतल्या तर संदीप वारियर याने 2 विकेट घेतल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
काय योगायोग म्हणावा हा! उनाडकटने शेअर केला आपल्या दोन जर्सींचा फोटो, यामध्ये एक खेळाडू आहे कॉमन
‘धोनी भाईशी माझी तुलना होते, तेव्हा मी…’, बांगलादेशचे मैदान मारणाऱ्या ईशान किशनची खास प्रतिक्रिया