येत्या काही दिवसात इंडियन प्रीमियर लीग २०२२ (indian premier league) स्पर्धा सुरू होणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी बेंगलोरमध्ये खेळाडूंचा मेगा लिलाव (mega auction) पार पडला. हा लिलाव सोहळा १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी पार पडला. या लिलावात एकूण ६०० खेळाडूंवर मनसोक्त बोली लावण्यात आली. तर काही दिग्गज खेळाडू देखील होते, ज्यांना कोणीही खरिददार मिळालं नाही. लिलावाच्या पहिल्या दिवशी एकूण ९७ खेळाडूंवर बोली लावली गेली. ज्यामध्ये ७४ खेळाडू सोल्ड झाले. तर २३ खेळाडू अनसोल्ड राहिले. चला तर पाहूया, लिलावाच्या पहिल्या (१२ फेब्रुवारी) दिवशी खरेदी केलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी.
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) :
रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, कायरन पोलार्ड, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, डेवॉल्ड ब्रेविस, बसिल थंपी, मुरगन अश्विन.
चेन्नई सुपर किंग्ज (Chennai super kings) :
एमएस धोनी, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, रॉबिन उथप्पा, ड्वेन ब्रावो, अंबाती रायुडू, दीपक चाहर, केएम आसिफ, तुषार देशपांडे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) :
विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, फाफ डू प्लेसिस, दिनेश कार्तिक, शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेझलवूड, आकाशदीप.
दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) :
पृथ्वी शॉ, एनरिक नॉर्खिया,रिषभ पंत, अक्षर पटेल, डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, शार्दुल ठाकूर, मुस्तफिझूर रहमान, कुलदीप यादव, अश्विन हेब्बर, सरफराज खान, कमलेश नागरकोटी, केएस भरत
कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata knight Riders) :
आंद्रे रसेल, सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, वरुण चक्रवर्ती, नितीश राणा, पॅट कमिन्स, श्रेयस अय्यर, शिवम मावी, शेल्डन जॅक्सन.
सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad):
केन विलियमसन, उमरान मलिक, अब्दुल समद, वॉशिंग्टन सुंदर, निकोलस पूरन, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, प्रियम गर्ग, राहुल त्रिपाठी, अभिषेक शर्मा, कार्तिक त्यागी, श्रेयस गोपाल, जगदीश सुचित.
राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals):
संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, प्रसिद्ध कृष्णा, युझवेंद्र चहल, रियान पराग, केसी करिअप्पा.
पंजाब किंग्ज (Punjab Kings ):
मयंक अग्रवाल, अर्शदीप सिंग, शिखर धवन, कागिसो रबाडा, जॉनी बेअरस्टो, राहुल चाहर, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा, इशान पोरेल.
गुजरात टायटन्स (Gujrat titans):
हार्दिक पंड्या, शुभमन गिल, राशिद खान, मोहम्मद शमी, जेसन रॉय, लॉकी फर्ग्युसन, अभिनव सदरंगानी, राहुल तेवतिया, नूर अहमद, आर साई किशोर.
लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super giants):
केएल राहुल, रवी बिश्नोई, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, जेसन होल्डर, मनीष पांडे, क्विंटन डी कॉक, क्रुणाल पंड्या, मार्क वुड, आवेश खान, अंकित सिंग राजपूत.
महत्वाच्या बातम्या :
धोनीबाबत सीएसकेच्या सीईओंचे मोठे विधान; म्हणाले, “तो संघ…”
चार-चार संघ ज्याच्या मागे धावले ‘तो’ अभिनव सदारंगाणी कोण आहे?
मोठ्या रकमेची अपेक्षा असताना ‘या’ युवा खेळाडूंना मानावे लागले कमी किमतीत समाधान