---Advertisement---

आपण जर आयपीएल फॅन असाल तर ही आहे आपल्यासाठी महत्त्वाची बातमी!

On: शनिवार, जून 23, 2018 8:41 PM
---Advertisement---

जगभरात गेल्या काही वर्षापासून वाढत अससेल्या टी-20 लीग स्पर्धांमुळे आयसीसी पुढील आठवड्यात डब्लिन येथे होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत महत्वाचा निर्णय घेणार आहे.

इथून पुढे प्रत्येक खेळाडूला वर्षभरात दोनच लीग स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची मर्यादा आयसीसी खेळाडूंवर घालणार आहे. कोणताही खेळाडू दोनपेक्षा जास्त लीगमध्ये खेळू शकत नाही.

आयपीयल, बीग बॅश लीग आणि कॅरेबियन प्रिमिअर लीग यासारख्या लीग स्पर्धांमुळे खेळाडू राष्ट्रीय संघाला प्राधान्य न देता लीग स्पर्धांना प्राधान्य देत आहेत. त्यामुळे क्रिकेटचे नुकसान होत आहे अशी तक्रार काही क्रिकेट मंडळांनी आयसीसीकडे केली आहे.

डब्लिन येथे होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आयसीसी यावर एक समिती नेमून अंतिम निर्णय घेणार आहे.

आयसीसीने खेळाडूंच्या लीग स्पर्धांमधील सहभागावर मर्यादा आणावी यासाठी वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळाने पहिल्यादा सुचना केली होती.

प्रामुख्याने वेस्ट इंडीजचे खेळाडू जगभरातील सर्वच लीग स्पर्धांमध्ये प्राधान्याने खेळत असल्याने वेस्ट इंडीज संघाची अलिकडील काळात घसरण झाल्याचे आपण पाहीले आहे.

आयसीसीने जर या निर्णयावर शिक्केमोर्तब केल्यास ख्रिस गेल, सुनिल नारायन ब्रेंडन मॅक्कुलम, आद्रे रसेल आणि रशिद खान यांच्यासारख्या टी-20 स्पेशलिस्ट खेळाडूंच्या लीग स्पर्धांच्या सहभागावर मर्यादा येणार आहेत.

“या निर्णयाचा बीसीसीआय किंवा आयपीयलचे कोणतेही नुकसान होणार नाही. तसेच आयसीसीच्या कोणत्याही नियमाचा बीसीसीआय भंग करत नाही त्यामुळे या निर्णयाने आम्हाला चिंता करण्याचे काही कारण नाही.” असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या:

५ वर्षांपुर्वी याच दिवशी धोनी बनला होता जगातील सर्वात परिपुर्ण कर्णधार!

माजी कर्णधार अनिल कुंबळे सुरु करतोय नवी इनिंग!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment