क्रिकेटचा प्रकार कुठलाही असो, या खेळात प्रत्येक फलंदाजासाठी शतक झळकावणे ही खूप मोठी बाब असते. तसेच, शतक हे जर वाढदिवशीच आले, तर त्यावेळचा आनंद गगनात मावेनासा झाल्याशिवाय राहत नाही. अशीच काहीशी स्थिती ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू मिचेल मार्श याची झाली असावी. विश्वचषक 2023 स्पर्धेत शुक्रवारी (दि. 20 ऑक्टोबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान संघ आमने-सामने आहेत. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर रंगलेला सामना मार्शसाठी खूपच खास ठरला. विशेष म्हणजे, मार्श आज त्याचा 32वा वाढदिवस साजरा करत आहे. अशात या खास दिवशी त्याने खास पराक्रम नावावर केला आहे.
मिचेल मार्शचा खास पराक्रम
मिचेल मार्श (Mitchell Marsh) याने या सामन्यात सलामीला फलंदाजी करताना 108 चेंडूत 121 धावांची शानदार शतकी खेळी केली. त्याच्या या खेळीत 9 षटकार आणि 10 चौकारांचा समावेश होता. मार्शने वाढदिवशी हे शतक ठोकताच आपल्या नावावर खास पराक्रमाची नोंद केली. तो वाढदिवशी शतक ठोकणारा जगातील सहावा खेळाडू ठरला. हे त्याचे वनडे कारकीर्दीतील दुसरे शतक ठरले.
मार्शपूर्वी कुणी केलाय असा कारनामा?
मार्शपूर्वी वाढदिवशी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांची यादी पाहिली, तर त्यात अव्वलस्थानी न्यूझीलंडचा स्टार खेळाडू टॉम लॅथम (Tom Latham) आहे. त्याने 2022मध्ये हॅमिल्टन येथे 30व्या वाढदिवशी नेदरलँड्सविरुद्ध नाबाद 140 धावांची झंझावाती शतकी खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या स्थानी भारतीय महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आहे. त्याने 1998मध्ये शारजाह येथे 25व्या वाढदिवशी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 134 धावांची शतकी खेळी केली होती.
Mitchell Marsh, What a knock on his birthday….!!!!
121 runs from just 108 balls against Pakistan and added 259 runs for the opening wicket – A knock to remember in his career. pic.twitter.com/c8pRKGf2eA
— Johns. (@CricCrazyJohns) October 20, 2023
यानंतर यादीत तिसऱ्या स्थानी न्यूझीलंडचा महान फलंदाज रॉस टेलर (Ross Taylor) आहे. त्याने 1998मध्ये पल्लेकेले येथे 27व्या वाढदिवशी पाकिस्तानविरुद्ध नाबाद 131 धावांचा पाऊस पाडला होता. त्यानंतर चौथ्या स्थानी सनथ जयसूर्या (Sanath Jayasuriya) असून त्याने 2008मध्ये कराची येथे 39व्या वाढदिवशी बांगलादेशविरुद्ध 130 धावा चोपल्या होत्या. यानंतर यादीत शेवटच्या स्थानी भारताचा माजी खेळाडू विनोद कांबळी (Vinod Kambli) याचा समावेश आहे. त्याने 1993मध्ये जयपूर येथे 21व्या वाढदिवशी इंग्लंडविरुद्ध नाबाद 100 धावा केल्या होत्या.
वाढदिवशी वनडेत शतक झळकावणारे खेळाडू
140* – टॉम लॅथम, विरुद्ध- नेदरलँड्स, हॅमिल्टन, 2022 (30वा)
134 – सचिन तेंडुलकर, विरुद्ध- ऑस्ट्रेलिया, शारजाह, 1998 (25वा)
131* – रॉस टेलर, विरुद्ध- पाकिस्तान, पल्लेकेले, 2011 (27वा)
130 – सनथ जयसूर्या, विरुद्ध- बांगलादेश, कराची, 2008 (39वा)
121* – मिचेल मार्श, विरुद्ध- पाकिस्तान, बंगळुरू, 2023 (32वा)
100* – विनोद कांबळी, विरुद्ध- इंग्लंड, जयपूर,1993 (21वा)
विशेष म्हणजे, मिचेल मार्श हा वाढदिवशी शतक ठोकणारा रॉस टेलर याच्या नंतरचा दुसरा खेळाडू आहे. टेलरने 2011मध्ये पल्लेकेले येथे पाकिस्तानविरुद्ध 131 झंझावाती खेळी केली होती. (Players registering ODI hundreds on their birthdays mitchell marsh sixth cricketer)
हेही वाचा-
ये तोहफा हमने खुद को दिया! 32व्या वाढदिवशी मार्शचे तडाखेबंद शतक
दमदार वॉर्नर! पाकिस्तानविरुद्ध ठोकले सलग चौथे झंझावाती शतक, ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत