उद्यापासून आयपीएलच्या ११ व्या मोसमाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता प्रत्येकजण आयपीएलच्या तयारीला लागला आहे. यावर्षी आयपीएल २०१८ साठी २७ आणि २८ जानेवारीला लिलाव झाला. या लिलावात अनेक आश्चर्यकारक निर्णय सर्वांसमोर आले.
त्यामुळे यावर्षी प्रत्येकसंघाची संघबांधणी बदलली आहे. तसेच यावर्षी अनेक खेळाडू पुन्हा एकदा त्यांच्या जुन्या फ्रॅन्चायझींकडून खेळताना दिसणार आहेत. म्हणजेच ज्या फ्रॅन्चायझींकडून या खेळाडूंनी आयपीएलमध्ये खेळायला सुरुवात केली होती त्या फ्रॅन्चायझींनी पुन्हा त्यांच्या या जुन्या खेळाडूंना यावर्षी संघात सामील करून घेतले आहे.
यात भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग, सलामीवीर गौतम गंभीर, मुरली विजय यांसारखे खेळाडू आहेत.
हे खेळाडू परतले त्यांच्या जुन्या फ्रॅन्चायझीकडे
युवराज सिंग – किंग्स इलेव्हन पंजाब (२००८-१०)
गौतम गंभीर – दिल्ली डेअरडेव्हिल्स (२००८-१०)
जेपी ड्युमिनी – मुंबई इंडियन्स (२००९-१०)
मुरली विजय – चेन्नई सुपर किंग्स (२००९-१३)
ग्लेन मॅक्सवेल – दिल्ली डेअरडेव्हिल्स (२०१२)
पार्थिव पाटील – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (२०१४)
विनय कुमार – कोलकाता नाईट रायडर्स (२०१४)
नमन ओझा – दिल्ली डेअरडेव्हिल्स (२०११-१३)
आदित्य तारे – मुंबई इंडियन्स (२०१०-१५)
सूर्यकुमार यादव – मुंबई इंडियन्स (२०१२-१३)