PR Sreejesh :- पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाने चौथे पदक जिंकले आहे. गुरुवारी भारतीय हॉकी संघाची ब्राँझपदकासाठी स्पेनशी लढत झाली. ज्यामध्ये संघाने 2-1 असा शानदार विजय नोंदवला. या विजयानंतर भारतीय संघाने जोरदार जल्लोष केला. भारतीय गोलरक्षक पीआर श्रीजेशच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हा शेवटचा सामनाही होता. यासह त्याला खेळाडूंनी विजयी निरोप दिला. या जल्लोषाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
उपांत्य फेरीत जर्मनी विरुद्ध पराभूत झाल्यामुळे भारतीय संघाला हा सामना खेळावा लागला होता. स्पेन संघाने पहिला गोल नोंदवत आघाडी घेतली होती. मात्र, यानंतर भारतीय संघासाठी कर्णधार हरमनप्रीत याने दोन गोल नोंदवले. हेच गोल निर्णायक ठरले. यासह भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा ऑलिंपिक्समध्ये पदक जिंकले.
भारतीय हॉकी संघाचे हे एकूण तेरावे ऑलिंपिक्स पदक आहे. भारताने आतापर्यंत आठ सुवर्णपदके, चार कांस्य पदके व एक रौप्य पदक जिंकले आहे. मागील वेळी झालेल्या टोकियो ऑलिंपिकमध्ये भारताने तब्बल 41 वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपुष्टात आणला होता.
या विजयानंतर अखेरचा सामना खेळलेला श्रीजेश उत्साही दिसत होता. त्याने गोलपोस्टवर चढाई केली. भारताच्या विजयानंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक क्रेग फुल्टन यांनीही हा विजय साधेपणाने साजरा करण्यास सांगितले. यानंतर भारतीय संघ श्रीजेशकडे धावला. त्यांनी श्रीजेशला मानवंदना दिली.
🏑 𝐏𝐑 𝐒𝐫𝐞𝐞𝐣𝐞𝐬𝐡, 𝐬𝐢𝐠𝐧𝐢𝐧𝐠 𝐨𝐟𝐟! ✍️🙇♂️🙇♀️#Paris2024 pic.twitter.com/19xQU3vXAo
— Olympic Khel (@OlympicKhel) August 8, 2024
तसेच भारताने सामना जिंकल्यावर श्रीजेशने मैदानातच लोटांगण घातले. त्याने झोपून त्याच्या हेल्मेटला आणि गोलपोस्टला सलाम केला. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. यानंतर श्रीजेशने सर्वांना मिठी मारली. भारतीय संघाचा कर्णधार हरमनप्रीत याने स्वतः श्रीजेशला खांद्यावर उचलत मैदानात फेरी मारली.
– 18 years.
– 336 matches.
– 2 Olympic medals.
– 2 medals in Commonwealth games.
– 3 medals in Asian Games.Parattu Raveendran Sreejesh, The Wall of Indian Hockey. 🐐 pic.twitter.com/3VlmFDjLx2
— Johns. (@CricCrazyJohns) August 8, 2024
श्रीजेश याने सामन्यानंतर आपल्याला पाठिंबा देणाऱ्या सर्व चाहत्यांचे, कुटुंबाचे व संघटनांचे आभार मानले. तसेच, भविष्यात भारतीय हॉकी सोबत जोडून राहण्यास आवडेल असे देखील तो म्हणाला.
हेही वाचा –
श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर टीम इंडिया जाणार मोठ्या ब्रेकवर, जाणून घ्या पुढील वेळापत्रक
भारतीय खेळाडू विश्रांतीवर असताना ‘या’ खेळाडूच्या नेतृत्त्वाखाली सूर्यकुमार खेळणार देशांतर्गत क्रिकेट
बीसीसीआयमध्ये नोकरीची संधी, असा करा अर्ज; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया