भारतीय संघाचे टी२० विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले आहे. विश्वचषकापूर्वी भारतीय संघाचे खेळाडू आयपीएलमध्ये खेळत होते. आयपीएलनंतर दोनच दिवसात विश्वचषकाला सुरुवात झाली आणि खेळाडूंना या दोन्ही स्पर्धांदरम्यान विश्रांतीसाठी वेळ मिळाला नव्हता. अशात आता भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि दिग्गज अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांनी त्यांचे म्हणणे मांडले आहे.
त्यांनी विश्वचषकात भारतीय संघाने केलेल्या खराब प्रदर्शनामागची काही कारणे स्पष्ट केली आहेत. तसेच पुढच्या वर्षात ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी तयारीला लागा, असेही सांगितले आहे.
कपिल देव एबीपी न्यूजशी बोलताना म्हणाले की, “भविष्याकडे पाहण्याची वेळ आली आहे. तुम्हाला लवकरात लवकर योजना बनवावी लागणार आहे. असे नाहीये की, विश्वचषक संपल्यानंतर भारतीय संघाचे पूर्ण क्रिकेटच संपेल. जावा आणि योजना बनवा. मला वाटते की, आयपीएल आणि विश्वचषकामध्ये अंतर असले पाहिजे होते, पण आज निश्चित स्वरूपात आपल्या खेळाडूंकडे खूप जास्त जोखीम आहे, पण त्यांना त्याचा जास्तीत जास्त फायदा घेता आला नाही.”
कपिल यांनी एक मोठी प्रतिक्रिया देली आहे. त्यांच्या मते काही खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळायला आवडते, पण देशासाठी खेळण्याला महत्व देत नाहीत. त्यांनी बीसीसीआयला या गोष्टीकडे लक्ष द्यायला सांगितले आहे. मी फ्रेंचायझी क्रिकेटच्या विरोधात नाही, पण त्याची पद्धत दुसरी पाहिजे, असेही कपिल म्हणाले आहेत.
“जेव्हा खेळाडू देशासाठी खेळण्यापेक्षा आयपीएलला प्राथमिकता देतात, तर आपण काय करू शकतो. खेळाडूंना त्यांच्या देशासाठी खेळण्यामध्ये अभिमान असला पाहिजे. मला त्यांच्या आर्थिक स्थितीविषयी जास्त माहीत नाही, त्यामुळे जास्त काही बोलू शकत नाही. पण मला वाटते की, पहिल्यांदा देशाचा संघ आणि त्यानंतर फ्रेंचायझी असली पाहिजे. मी असे म्हणत नाही की, तेथे क्रिकेट खेळू नका, पण आता ही जबाबदारी बीसीसीआयची आहे की, त्यांनी त्यांच्या क्रिकेटचे योग्य नियोजन करावे. या स्पर्धेत आम्ही ज्या चुका केल्या, त्या पुन्हा न करणे, ही आमच्यासाठी सर्वात मोठी शिकवण आहे,” असे कपिल म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या –
जाता-जाता शास्त्री गुरूजींनी फोडला बॉम्ब! म्हणाले, “आयपीएलमूळे विश्वचषकात…”
‘भारतीय संघ चांगल्या हाती आहे’, म्हणत विराटने दिले पुढील भारतीय टी२० कर्णधाराबाबत संकेत
कर्णधार म्हणून अखेरच्या सामन्यात विराटची अनोखी ‘फिक्टी’