सध्या जगभरात कोरोना व्हायरसचा प्रसार वेगाने होत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम क्रीडास्पर्धांवरही होत आहे. अनेक स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. तर अनेक स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्डने म्हटले आहे की ही स्वत:च्या कारकिर्दीबद्दल आत्मपरिक्षण करण्याची आणि मानसिक आणि शारिरिकदृष्ट्या तंदुरुस्त रहाण्यासाठी उत्तम वेळ आहे.
जमैका ग्लेनरने दिलेल्या वृत्तानुसार पोलार्ड म्हणाला, ‘कारकिर्दीबाबद आत्मपरिक्षण करण्याची ही योग्य वेळ आहे. आपण आपल्या कारकीर्दीत एक व्यक्ती म्हणून आपण कुठे आहोत आणि आपल्याला पुढे जाण्यासाठी काय मिळवायचे आहे, हे पाहण्यासाठी ही चांगली वेळ आहे.’
तसेच पोलार्ड म्हणाला, ‘आपल्याला या वेळेत मानसिक आणि शारिरिकदृष्ट्याही तंदुरुस्त रहावे लागेल. कारण जेव्हा सर्व ठिक होईल आणि आपल्याला जेव्हा दौऱ्यावर जावे लागेल तेव्हा कदाचित आपल्याकडे तयारीसाठी पुरेसा वेळ नसेल. पण या वेळात तूम्हाला सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी मानसिकरित्या तयार रहावे लागेल.’
अन्य क्रिकेट बोर्डांपैकी वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डानेही देशांतर्गत क्रिकेटचा मोसम कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेत पुढे ढकलला आहे.
ट्रेंडिग घडामोडी –
–१९९८च्या आयसीसी वनडे क्रमवारीतील टॉप १० खेळाडू पाहून व्हाल थक्क
या १० महान खेळाडूंवर विश्वचषक कायम रुसलाच
–गांगुलीला २००३च्या क्रिकेट विश्वचषकात हवा होता धोनी!